श्रीपाद नाईकांना गरज पडल्यास दिल्लीतील 'एम्स'मध्ये दाखल करणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

गोमेकॉ इस्पितळात केंद्रीय आयुषमंत्री व राज्य संरक्षणमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत समाधानी असून गरज पडल्यास दिल्ली एम्स इस्पितळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थलांतर केले जाईल.

पणजी :  गोमेकॉ इस्पितळात केंद्रीय आयुषमंत्री व राज्य संरक्षणमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत समाधानी असून गरज पडल्यास दिल्ली एम्स इस्पितळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थलांतर केले जाईल असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोमेकॉ इस्पितळ डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर व्यक्त केले.

नाईक काल कर्नाटकातील अंकोलाजवळ झालेल्या अपघातात जबर जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नी विजया या अपघातात मृत्यूमुखी पडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की मध्यरात्री अडीच ते सकाळी सात या दरम्यान नाईक यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून शरीर उपचाराला प्रतिसाद देत आहे

संबंधित बातम्या