‘टुलकिट’ प्रकरणी शुभम चौधरीला गोवा खंडपीठाकडून अटकपूर्व जामीन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

दिल्ली येथील शेतकरी आंदोलन ‘टुलकिट’प्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्यातील गोव्यात स्थित असलेल्या संशयित शुभम कर चौधरी याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला.

पणजी : दिल्ली येथील शेतकरी आंदोलन ‘टुलकिट’प्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्यातील गोव्यात स्थित असलेल्या संशयित शुभम कर चौधरी याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला. जामिनासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज करण्यासाठी त्याला 10 दिवसांची मुदत दिली आहे. या दरम्यान त्याला अटक झाल्यास सशर्त जामिनावर सोडण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.

दिल्लीतील सायबर कक्ष पोलिसांनी ‘टुलकिट’प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अर्जदार शुभम कर चौधरी याचा समावेश असल्याने त्याला दिल्ली पोलिसांकडून कोणत्याही अटक होईल या भीतीने त्याने उच्च न्यायालयात ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. गोवा खंडपीठाने त्याची विनंती मंजूर करताना सशर्त ट्रान्झिट अटकपूर्व जामीन दिला आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केल्यास त्याची 50 हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर व तत्सम रक्कमेच्या एका हमीदारावर सुटका करावी, असे आदेशात म्हटले आहे. निकिता जॅकोब, शंतून मुलूक व दिशा रवी या तिघांनी संगनमताने ऑनलाईन ‘टुलकिट’ तयार केला मात्र त्याच्याशी अर्जदाराचा काही संबंध नाही.

त्याला यामध्ये खोट्या पद्धतीने गुंतवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे, त्याच्याशी काहीच संबंध नाही. या तिघांनाही उच्च न्यायालयाने ट्रान्झिट अटकपूर्व जामीन दिलेला आहे. त्यामुळे अर्जदारालाही तो द्यावा, अशी बाजू ॲड. कार्लोस फेरेरा यांनी मांडली. दिल्ली पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीत जाण्यासाठी वेळ लागणार आहे. त्या दरम्यान अटक होऊ शकते, असा दावा अर्जदाराच्या वकिलांनी केला.

गोव्यात राज्यपाल व राज्य निवडणूक आयोग पूर्णवेळ नेमा - विजय सरदेसाई 

संबंधित बातम्या