
Goa Agriculture: शेतीव्यवसायासाठी सरकार वेगवेगळ्या पद्धतीने विविध योजना राबवत आहे. त्याचा लाभ घ्यावा. शिवाय बांधांची पुनर्बांधणी करून शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न प्रयत्न व्हायला हवा, असे प्रतिपादन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
पार्से येथील खाजन-गुंडो बांधाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी शिरोडकर बोलत होते. यावेळी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पार्से पंचसदस्य सुनीता बुगडे देसाई, श्री. नाईक, अभियंते, ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोचणे गरजेचे आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून खाजन गुंडो बांधाचे बांधकाम केले. त्यावेळी दूरदृष्टी ठेवल्यामुळेच या बांधामुळे शेतीव्यवसायाला चालना मिळाली असली तरी अजूनही काही ठिकाणी पडीक जमीन आहे, असे शिरोडकर म्हणाले.
आमदार जीत आरोलकर म्हणाले की, खाजन-गुंडो बांधाची पुनर्बांधणी आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी आपण जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांना विनंती केल्यानंतर त्यांनी या परिसराची पाहणी केली आणि दुरुस्ती कामासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.
पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण
एखाद्या वेळी प्रकल्पाचे काम रखडले किंवा ते निकृष्ट दर्जाचे झाले किंवा शेतकरी शेतजमीन पडीक ठेवत असेल पत्रकारांनी आपली भूमिका बजवावी. पत्रकारांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन द्यावे, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.
निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल कंत्राटदारावर कोणती कारवाई केली जाईल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता कंत्राटदाराला कशा पद्धतीचं काम दिलं होतं आणि त्याच्या दुरुस्तीचा मर्यादा संपली आहे काय याची पाहणी केली जाईल. या सर्व गोष्टींवर पत्रकारांनीच काम करावे असे सांगून आपल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.