गोमेकॉ इस्पितळ ते दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळपर्यंत शटल सेवा सुरू करणार: विश्‍वजित राणे

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

राज्यातील कोरोना संसर्गाबाबत तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खाते व गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याबरोबर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील व्यवस्थेसंदर्भात बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.

पणजी: राज्यातील कोरोना संसर्गाबाबत तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खाते व गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याबरोबर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील व्यवस्थेसंदर्भात बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. या इस्पितळासाठी अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार आहे. डॉक्टर्स व आरोग्य सल्लागारांसाठी गोमेकॉ इस्पितळ ते दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळपर्यंत शटल सेवा सुरू करण्यात येणार आहे. (Shuttle service from Gomeco Hospital to South Goa District Hospital: Vishwajit Rane) 

गोव्यातील सार्वजनिक गुढीपाडव्याची ‘वंदे मातरम’ ने होणार सांगता

रुग्णांबरोबर आरोग्याबाबत माहिती घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना आवश्‍यक प्रमाणात प्रतिबंधक उपकरणे उपलब्ध आहेत याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीटी स्कॅनसाठी ज्या रुग्णांना डॉक्टर सल्ला देण्यात देतील त्यांच्यासाठी ईएसआय इस्पितळ व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ येथे १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहे. आरोग्य खात्याचे तसेच गोमेकॉ इस्पितळाचे कर्मचारी कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

संबंधित बातम्या