कुडका-बांबोळीच्या उपसरपंचपदी सिध्देश ऊर्फ गौतम नाईक

Kishor Naik
शनिवार, 15 ऑगस्ट 2020
कुडका - बांबोळी तळावली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सिध्देश ऊर्फ गौतम नाईक यांची आज बिनविरोध निवड झाली. सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व कुडका सरपंच बेरोडिनिया डिसोझा व अन्य पंच सदस्यांनी त्यांचे यावेळी अभिनंदन केले.

गोवा वेल्हा
अकरा पंच सदस्य असलेल्या या पंचायतीच्या एकूण आठ पंच सदस्यांचा नवनियुक्त उपसरपंच सिध्देश नाईक यांना पाठिंबा लाभला. यात सरपंच वेरोडिनिया डिसोझा, मोविन गोन्साल्वीस, रोशन वेर्णेकर, विद्या नाईक, दिओना कोरगावकर, सुभाष शिरोडकर, सुषमा शिरोडकर व कृष्णा काणकोणकर यांचा समावेश होता. यावेळी सूर्यकांत आंद्राद व मारिया डिकुन्हा हे दोन पंच सदस्य गैरहजर होते. सिध्देश नाईक यांचा एकमेव अर्ज उपसरपंचपदासाठी आल्याने सरकारी निवडणूक अधिकारी यांनी त्यांना उपसरपंच म्हणून घोषित केले. यावेळी येथे उपस्थित असलेल्यांनी नवनियुक्त उपसरपंच श्री. नाईक यांचे अभिनंदन केले.
उपसरपंच सिध्देश नाईक म्हणाले, की २०१२ पासून आपण या ग्रामपंचायतीचा पंच सदस्य म्हणून काम पाहिले आहे. आज उपसरपंचपदापर्यंत आपण येऊन ठेपलो असलो, तरी इतक्या वर्षांत आपण केलेल्या चांगल्या कार्याची ही पावती आहे असे मी मानतो. या काळात सर्वांचे सहकार्य आपल्याला लाभले. या सर्वांचे मी आभार मानतो. या पंचायतीला स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचे नेहमीच सहकार्य लाभत आले आहे. ते तसेच पुढे चालू राहील याची आपणास खात्री आहे व त्यांनी ते यापुढेही चालू ठेवावे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या