ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांच्याविरुद्ध सिद्धेश नाईक यांची पोलिसात तक्रार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 27 डिसेंबर 2020

ॲड. आयरिश रॉंड्रिग्ज हे आपल्या वडिलांची बदनामी करणारा मजकूर समाज माध्यमांवर प्रसारीत करत आहेत, अशी पोलिस तक्रार भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश यांनी केली आहे.

पणजी :  ॲड. आयरिश रॉंड्रिग्ज हे आपल्या वडिलांची बदनामी करणारा मजकूर समाज माध्यमांवर प्रसारीत करत आहेत, अशी पोलिस तक्रार भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश यांनी केली आहे. त्यांनी या तक्रारीसोबतसमाज माध्यमावर सध्या फिरत असलेल्या मजकुराच्या प्रती जोडल्या आहेत.

त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे, की अशा मजकुरामुळे आपल्या वडिलांच्या स्वच्छ प्रतिमेला धक्का बसला आहे. मजकुरातून जनतेला आपल्या वडिलांची व आपली बदनामी करण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. त्यासाठी खोट्या आरोपांचा आणि वक्तव्यांचा आधार घेतला जात आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतही रॉड्रिग्ज अडथळा निर्माण करत आहेत. त्यांनी या तक्रारी पणजी पोलिस ठाणे व रायबंदर येथील सायबर गुन्हे शाखेकडे केल्या आहेत. रॉड्रिग्ज यांनी आपल्याला दलाल संबोधल्याचे व त्यांच्या समाज माध्यमावरील मजकुरामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता असल्याकडेही नाईक यांनी तक्रारीतून पोलिसांचे लक्ष वेधले आहे. या तक्रार अर्जाची प्रत त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनीही पाठवली आहे.

संबंधित बातम्या