उत्पलनंतर आता सिद्धेश नाईक बंडाच्या पवित्र्यात

कुंभारजुवेतून उमेदवारी न मिळाल्याने नाराजी, अपक्ष लढण्याची शक्यता
Siddhesh Naik
Siddhesh NaikDainik Gomantak

पणजी : गेल्या कित्येक दिवसांपासून जनतेचे लक्ष असलेली भाजपची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर जुने गोवे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश श्रीपाद नाईक यांचे नाव कुंभारजुवे मतदारसंघासाठी निवडले गेले नसल्याने वातावरण तापलं आहे. उत्पल पर्रीकर यांच्यापाठोपाठ आता सिद्धेश नाईक याला उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस उरल्याने नाईक यांना निवडणूक लढवायची असल्यास तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. सिद्धेश नाईक हे निवडणूक लढवण्यासाठी बंड करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. (Siddhesh Naik News Updates)

Siddhesh Naik
Goa Election: उत्पल पर्रीकर आज पणजीतून उमेदवारी अर्ज भरणार?

भाजपने 34 उमेदवारांची पहिली यादी 21 जानेवारीला घोषित झाल्यानंतर उर्वरित 6 मतदारसंघात तिढा निर्माण झाल्याने त्याची घोषणा करण्यासाठी पक्षाने वेळ घेतला. काल जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीमध्ये कुंभारजुवेमधून आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी जनिता मडकईकर यांना उमेदवारी दिल्याने केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे दुखावले गेले आहेत. पक्षाने हा कठोर निर्णय घेताना सिद्धेश नाईक हे भाजप केंद्रीयमंत्र्यांचे पुत्र असल्याने उमेदवारीचा विचार केलेला नाही. यापूर्वी भाजपने उमेदवारी नाकारलेल्या पक्षत्याग करून अपक्ष उमेदवार म्हणून निर्णय घेतला आहे तर काहींनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. त्यामध्ये उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar), लक्ष्मीकांत पार्सेकर, इजिदोर फर्नांडिस, एलिना साल्ढाना याचा समावेश आहे. त्यामुळे सिद्धेश नाईक हे कुंभारजुवेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत व त्यासाठी जोरदार तयारीही केली आहे. या बिकट स्थितीत ते पक्षत्याग करून अपक्षपणे निवडणूक लढवणार का याकडे आता लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Siddhesh Naik
Goa Election: कुंभारजुवेमधून रोहन हरमलकर अपक्ष लढणार

सहा मतदारसंघातील उमेदवारांची यादी कालपर्यंत घोषित करण्यात आली नव्हती मात्र डिचोलीतून राजेश पाटणेकर तर कळंगुटमधून जोझेफ सिक्वेरा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे कुंभारजुवे, सांताक्रुझ, कुठ्ठाळ्ळी व कुडतरी या चार मतदारसंघ यासंदर्भातचा निर्णय बाकी होता. कुंभारजुवे व सांताक्रुझ या दोन मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते याकडे गेले कित्येक दिवस भाजप (BJP) कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. जुने गोवे जिल्हा पंचायत निवडणुकीत मडकईकर यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच सिद्धेश नाईक हे निवडून आले होते त्यामुळे पक्षाने पांडुरंग मडकईकर यांची कुंभारजुवेत असलेली पकड या विचार करता त्यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन झुकते माप दिले आहे.

Siddhesh Naik
AAP Amit Palekar: पैसा नाही, ओळख नाही, पण नोकरी हवी? मग AAP ला मत द्या

दरम्यान, सांताक्रुझमध्ये बाबुश मोन्सेरात (Babush Monseratte) यांनीच आमदार अँथनी ऊर्फ टोनी फर्नांडिस यांना मागील निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मदत केली होती. मात्र यावेळी त्यांनी ताळगावचे माजी सरपंच आग्नेल डिकुन्हा यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले होते. त्यामुळे दोन्ही
उमेदवार हे मोन्सेरात यांचेच असल्याने उमेदवारी देण्याबाबत पक्षासमोर पेच निर्माण झाला होता. मात्र अखेर टोनी फर्नांडिस यांनी यावर मात केली. मोन्सेरात यांनी तिसवाडीतील पाचही मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आणण्याचे पक्षाला आश्‍वासन दिले आहे त्यामुळे ते त्यामध्ये कितपत यशस्वी ठरतात हे येत्या 14 फेब्रुवारीला लोकांच्या मतदानावरुन स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com