Siddhi Naik Case: मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने प्रकरण सीबीआयकडे

अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केली आहे. पणजी येथे आज आयोजित पत्रकार फरिषदेत चोडणकर यांनी ही मागणी केली.
Siddhi Naik Case: मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने प्रकरण सीबीआयकडे
Siddhi Naik CaseDainik Gomantak

पणजी: सिध्दी नाईक हिच्या मृत्यूला महिना उलटूनही तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी या प्रकरणी पारदर्शक तपास करुन नेमके कारण शोधून काढण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे सिध्दी नाईक प्रकरण (Siddhi Naik Case) सीबीआयकडे (CBI) द्यावे. अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केली आहे. पणजी येथे आज आयोजित पत्रकार फरिषदेत चोडणकर यांनी ही मागणी केली.

Siddhi Naik Case
Goa Murder Case: पिडीतेला बुडवूनच मारल्याची शक्यता

सिध्दी नाईक हिचा मृत्यू पाण्यात बडुन झाला की तिचा खून झालाय? हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने सिध्दी नाईक हिच्या घरच्याना न्याय मिळालेला नाही. मुख्यमंत्री स्वता या प्रकरणी तपासासाठी पुढाकार घेण्याचे सांगत होते. मात्र तसे काही झालेले नाही. त्यामुळे सिध्दी नाईक हिच्या मारेकऱ्याना सरकारमधील काही लोक वाचवत असल्याचा संशय बळावला आहे. असे सांगून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या प्रकरणी लवकर तपास न झाल्यास हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची शिफारस केली होती. त्याला आपला पाठिंबा असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. सिध्दी नाईक हिच्या मृत्यूचा योग्य तपास सीबीआय करु शकते. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणे गरजेचे असल्याची मागणी चोडणकर यांनी केली.

Related Stories

No stories found.