विदेशी पर्यटकांचा पत्ताच नाही; गोव्यातील व्यावसायिकांचे मोडले कंबरडे

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 9 मे 2021

राज्याला खाण व्यवसायानंतर पर्यटन व्यवसायातून करोडो रुपये सरकारला महसूल मिळतो. मात्र कोरोना महामारीमुळे यंदाही पर्यटन व्यवसाय धोक्यात आला असून विपरीत परिणाम झाला आहे.

मोरजी: राज्याला(Goa) खाण(Mine) व्यवसायानंतर पर्यटन(Tourism) व्यवसायातून(Business) करोडो रुपये सरकारला महसूल मिळतो. मात्र कोरोना महामारीमुळे(Corona) यंदाही पर्यटन व्यवसाय धोक्यात आला असून विपरीत परिणाम झाला आहे. जवळ जवळ 50 टक्के पर्यटकांमध्ये घट झाली असून विदेशी पर्यटकांचा(foreign tourists) तर पत्ताच नाही. त्यामुळे  समुद्र किनाऱ्याव शुकशुकाट पसरला आहे.(Silence on the beach No foreign tourists in Goa )

किनारी भागात 24 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत किनारी भागात देशी पर्यटकांची गर्दी होती. मात्र त्यानंतर पर्यटकांनी किनाऱ्यावर कोरोनामुळे पाठ फिरवली. कोरोना महामारीने सर्वसामान्य नागरिक व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडून टाकले आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावरून विदेशी पर्यटकांना देशात आणि राज्यात यायला अजून परवानगी मिळालेली नाही. 

Goa Corona: राज्यात काल 3025 कोविडग्रस्त ठणठणीत बरे 

किनारी भागात एक नजर मारली तर कोणच दिसत नाही. पर्यटन हंगाम ऐन भरात आला होता, तेव्हाच  कोविडबाधितांची  संख्या वाढू लागली. त्यामुळे पर्यटक कमी झाले असून सध्या येतील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, छोटे छोटे व्यापारी, गाडेवाले, कपडे, दुध दुकान, मासेवाले,  सायबर कॅपे, पायलट, विविध प्रकारच्या व्यवसायावर जबरदस्त परिणाम दिसून येतो. शिवाय ज्यांनी लाखो करोडो रुपयांची गुंतवणूक करून लहान मोठी घरे दुकाने गेस्ट हाऊज उभारली. त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विचार करूनच घराबाहेर पाऊल टाका; पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांचा गोयेंकरांना इशारा 

विदेशी पर्यटक नसल्याने देशी पर्यटकांचा आकडाही दिवसेंदिवस घटत आहे . पूर्वी महिन्यासाठी एका घराला एक बेडरूम किचन हॉल अशा सोयी असलेल्या घराला महिन्याना 50 ते साठ हजार रुपये भाडे मिळायचे, तिथे आता 8 ते 10 हजार रुपये भाडे मिळत नाही, अशी स्थिती किनारी भागातील व्यावसायिकांची आणि स्थानिकांची झालेली आहे.

व्यावसिकांना फटका
शॅक, हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या हे व्यवसाय बंद आहेत. हॉटेल व्यवसायांत कर्मचारी 75 टक्के बाहेरचे बंगाल, ओरिसा, नेपाल या भागातील आहेत. आता सर्व कामगार बेकार आहेत, गोव्यातही बेकार आहेत, आता हॉटेल सुरु केली, तर गोवेकाराना हॉटेलात नोकऱ्याच्या संधी जास्त असल्याची माहिती सूरज नाईक यांनी दिली.

संबंधित बातम्या