अपात्रता याचिकेवर गोवा विधानसभा सभापतींचे मौन

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

कॉग्रेसमधून दहा तर मगोतून दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच्या अपात्रता याचिकेवर बोलण्यास गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी नकार दिला.

पणजी: कॉग्रेसमधून दहा तर मगोतून दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच्या अपात्रता याचिकेवर बोलण्यास गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी नकार दिला. तो विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर बोलणार नाही असे ते म्हणाले. 

या आमदारांना पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्र ठरावावे अशा मागण्या करणाऱ्या याचिका सभापतींसमोर कॉंग्रेस व मगोने सादर केल्या आहेत. त्यावर सभापती सुनावणी घेत नसल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आठवड्यात त्या याचिकांवर सुनावणी घेत ती फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. त्याचबाबत पाटणेकर यांना विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले.

आणखी वाचा:

मेळावलीत जमीन सर्वेक्षण होणारच -

संबंधित बातम्या