Silly Souls Café Case : सिली सोल्स प्रकरणात नवी अपडेट; आयुक्तांच्या आदेशाला आव्हान

सिली सोल्सप्रकरणी अबकारी आयुक्तांच्या आदेशाला मुख्य सचिवांसमोर आयरिश रॉड्रिग्ज यांचं आव्हान
Silly Souls Café and Bar | Smriti Irani
Silly Souls Café and Bar | Smriti IraniDainik Gomantak

Silly Souls Café Case : वादग्रस्त सिली सोल्स कॅफे अँड बारचा अबकारी परवाना मृत व्यक्तीच्या अँथनी डी गामा नावाने नूतनीकरण करण्यात आला होता. उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिलेल्या आदेशात हाच परवाना त्यांच्या विधवा पत्नीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी देऊन ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांचा अर्ज फेटाळला होता. या आदेशाला आता रॉड्रिग्ज यांनी मुख्य सचिवांसमोर आव्हान दिले आहे.

Silly Souls Café and Bar | Smriti Irani
Pankaj Tripathi in IFFI : अॅक्टिंग करणं डोक्यातही नव्हतं; मात्र तो टर्निंग पॉईंट आला आणि सगळंच बदललं

रॉड्रिग्ज यांनी मुख्य सचिवांकडे सादर केलेल्या आव्हान अर्जामध्ये अबकारी आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध 33 वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आहेत. अबकारी परवाना बेकायदेशीरपणे आणि चुकीची माहिती देऊन देण्यात आले होते, ते हस्तांतरित करण्याचा दिलेला आदेश चुकीचा आहे. मृत व्यक्तीच्या नावे अबकारी परवान्यासाठी अर्ज केलेल्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अबकारी खात्याने दाखल करून चौकशी करायला हवी ती करण्यात आली नाही, असा दावा रॉड्रिग्ज यांनी केला आहे. सिली सॉल्स कॅफे अँड बार हे भाडेपट्टीवर अबकारी परवान्याची मुदत संपण्यापूर्वी देण्यात आला होता. त्यामुळे डिगामा यांच्या नावावरील परवान्याचे नुतनीकरण करण्याचा प्रश्‍न येत नाही, असा दावाही रॉड्रिग्ज यांनी केला होता.

Silly Souls Café and Bar | Smriti Irani
Pankaj Tripathi in IFFI : अॅक्टिंग करणं डोक्यातही नव्हतं; मात्र तो टर्निंग पॉईंट आला आणि सगळंच बदललं

20 जुलै 2022 रोजी उत्पादन शुल्क आयुक्तांसमोर दाखल केलेल्या तक्रारीत ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी बेकायदेशीर पद्धतीने जानेवारी 2021 मध्ये अँथनी डीगामा यांच्या नावाने अबकारी परवाना घेण्यात आला होता. त्यांच्या निधनानंतर जून 2022 मध्ये त्यांच्याच नावावर या परवान्याचे नुतनीकरण केले होते. मृत व्यक्तीच्या नावावर हे नुतनीकरण करण्यात आले ते अवैध आहे. परवान्याचे नुतनीकरण करण्यापूर्वी हा सिली सॉल्स कॅफे अँड बार हा भाडेपट्टीवर चालवण्याचा करार केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबाचा सहभाग असलेल्या जी उग्रेया मर्केंटाइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करण्यात आला होता. त्यासंदर्भातचे पुरावे म्हणून रॉड्रिग्ज यांनी कंपनीचा जीएसटी क्रमांक उघडकीस आणला होता. मात्र आयुक्तांनी अबकारी परवाना मयत अँथनी डिगामा यांच्या पत्नीच्या नावे हस्तांतरित करण्यास परवानगी देण्याचा आदेश दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com