Goa News: सिल्वेरा यांची विकासकामांत लुडबूड- वीरेश बोरकर

मतदारसंघातील कामे अकारण रखडल्याचा दावा
Viresh Borkar
Viresh BorkarDainik Gomantak

Goa News सांत आंद्रे मतदारसंघात विद्यमान आमदार वीरेश बोरकर आणि माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यात विकासकामांवरून पुन्हा कलगी तुरा सुरू झाला आहे. सांत आंद्रेतील विकासकामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन फाईल्सना मान्यता देण्यास विलंब होत असल्याने कामे मंदावली आहेत.

गेले 15 दिवस या कामांचा पाठपुरावा करूनही ती पुढे जात नाहीत. त्यातच माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे आपण काम केल्याचा दावा करत असून त्यांच्याकडून विकासकामांत लुडबूड सुरू आहे, असा आरोप आमदार वीरेश बोरकर यांनी केला. पर्वरी येथील विधानसभा संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते.

सध्या माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा पक्ष सत्तेत असून त्यांनी विधानसभेत येण्याची गरज नाही. फोनवर त्यांनी कामे करून घेतली पाहिजेत. कामे जेव्हा पूर्ण होऊ लागतात, तेव्हा माजी आमदार प्रकट होऊन ते काम आपण करत असल्याचे दावा करतात. त्यासाठी त्यांना विधानसभेत येण्याची गरज नाही.

माझ्या कार्यकाळात कामे मंजूर झाली असल्याचा दावा ते करतात. शिरदोन, पाळे, झुआरी येथील लोकांना बऱ्याच वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. पण मी आमदार असताना पाण्याची समस्या नव्हती, असे विधानही सिल्वेरा यांनी केले आहे. माजी आमदारांच्या राजकीय दबावतंत्राला अजिबात घाबरणार नाही, असे बोरकर यांनी ठणकावून सांगितले.

सांत आंद्रेच्या मतदारांनी मतदारसंघाचा विकास करण्याची जबाबदारी मला दिली आहे. त्यासाठी मी स्वतः शासकीय खात्यांमध्ये जाऊन कामांचा पाठपुरवठा करतो. माझ्या कार्यालयातील कर्मचारीदेखील पाठपुरावा करतात. परंतु कामे मंद गतीने कशी होतील, याची काळजी अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.

इतर मतदारसंघांची कामे पूर्ण होऊ लागली आहेत; परंतु सांत आंद्रेतील कामे रखडली आहेत. माजी आमदार विकासकामांबाबत राजकारण करून कामांंमध्ये अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप बोरकर यांनी केला.

Viresh Borkar
Mahadayi Water Dispute: म्हादई आंदोलकांची ‘जलस्त्रोत’वर धडक

बोरकरांबाबत मौन-

माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर विधानसभा संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते. परंतु विद्यमान आमदार वीरेश बोरकर यांच्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे विधान करण्याचे त्यांनी टाळले.

Viresh Borkar
City & Town Planning Department: नगर नियोजनचा ड्राफ्ट्समन तुयेकर निलंबित, प्रकरणाची राणेंकडून दखल

सांत आंद्रेतील विकास भाजप सरकार करत आहे. आज मतदारसंघातील लोक माझ्याकडे येत असतील, तर त्यांची कामे करण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने कामे सुरू आहेत. माझ्या कार्यकाळात सांत आंद्रेत पाणीपुरवठा सुरळीत होता. आता देखील पंचसदस्य माझ्याकडे आपली विकासकामे घेऊन येतात.

- फ्रान्सिस सिल्वेरा, माजी आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com