Goa: 75 लाखांच्या बनावट नोटा प्रकरणात बेळगावच्या दोघांसह सहा अटकेत

Goa: 75 लाखांच्या  बनावट नोटा प्रकरणात  बेळगावच्या दोघांसह सहा अटकेत
money.jpg

जोयडा: महाराष्ट्रात (Maharashtra) बनावट नोटा घेऊन जाण्याच्या तयारीत असताना दांडेली ग्रामीण पोलिसांनी (Police) सापळा रचून सहा संशयित आरोपींना पकडले. त्यांच्याकडून दोन कार, 75 लाखांच्या बनावट नोटा व चार लाख 50 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या. कारवारचे पोलिस (Karwar) अधीक्षक शिवप्रसाद देवराज यांनी आज दांडेली येथे पत्रकारांना ही माहिती दिली. (Six arrested in Rs 75 lakh counterfeit notes case)

शिवाजी श्रवण कांबळे, शब्बीर अ‍ॅन्थोनी कुट्टी, सागर कांडळूरकर, अमर नाईक (किणये, बेळगाव), किरण मधुकर देसाई, गिरीश पुजारी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजी संध्याकाळी बर्ची क्रॉस येथे दोन वाहनांची झडती घेतली असता दोन्ही कारच्या डिक्कीत बनावट नोटा आढळून आल्या.

साहित्‍य जप्‍त
प्रमुख संशयित आरोपी शिवाजी श्रवण कांबळे याच्या वनश्रीनगर, दांडेली येथील घरातून बनावट नोटा छापणारे यंत्र, इतर साहित्य जप्त केले. बेळगाव व रत्नागिरी येथील संशयितांनी चार लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा खरेदी करून जाताना बर्ची क्रॉस नाक्यावर पोलिसांनी सापळा रचून सहाही संशयितांना मुद्देमालासह अटक केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com