सहा नवीन दिवाणी न्यायाधीश नियुक्त 

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

मुंबई उच्च न्यायालयाच्या खात्यांतर्गत निवड समितीने केलेल्या शिफारशीवरून ही निवड झाली आहे.

पणजी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निवड करून दिलेल्या मंजुरीनुसार गोवा सरकारने नव्या ६ दिवाणी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या खात्यांतर्गत निवड समितीने केलेल्या शिफारशीवरून ही निवड झाली आहे. या नव्या न्यायाधीशांना दिवाणी न्यायालय, कनिष्ठ विभाग व न्यायदंडाधिरी प्रथम वर्ग पदावर नियुक्त करण्यात आली आहे.  
नव्याने नियुक्त झालेल्या दिवाणी न्यायाधीशांमध्ये अंकिता रमेश नागवेकर, क्विन्सी डिसिल्वा, वासिम हुसेन रिझवी, स्मिता उल्हास सैल, मनश्री मोहन नाईक व शबनम प्रताप नागवेकर यांचा समावेश आहे. नियुक्त करण्यात आलेले सर्व उमेदवार हे वैद्यकीयदृष्ट्या पूर्ण तंदुरुस्त तसेच एसआर १९६ नुसार त्यांची पार्श्‍वभूमी तपासण्यात आली आहे. नियुक्ती करण्यात आलेले न्यायाधीश हे दोन वर्षासाठी प्रोबेशनवर असतील व ही मुदतवाढ नियुक्ती अधिकारिणी वाढवू शकते असे अवर सचिव (आस्थापन) अमिर परब यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या