म्हापशात सहाजण पॉझिटिव्ह

Tushar Tople
शनिवार, 25 जुलै 2020

म्हापसा शहरात आज ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच २२ रोजी सकाळच्या सत्रात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हापसा पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात व नगराध्यक्षांच्या कार्यालयात आल्यामुळे नगराध्यक्ष व तीन नगरसेवक होम क्वारंटाईन झाले आहेत.

म्हापसा
गंगानगरमधील हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल पालिकेत आला होता. या गृहस्थाने आपण कोविड पॉझिटिव्ह आहोत की नाही हे कळण्यापूर्वी सर्वत्र फिरुरून लोकांना संकटात ओढले आहे. गंगानगर व एकतानगरच्या सीमेवर या गृहस्थाचे घर आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच म्हापसा पालिकेतील अनेक कर्मचारी त्याच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे.
आज सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गंगानगर २, खोर्ली १, गावसवाडा १, धुळेर १, शेट्येवाडा १ असे आहेत. त्यातील शेट्येवाडा येथील काल व आज सापडलेले २ पॉझिटिव्ह रुग्ण हे म्हापसा बाजारपेठेत मटण, चिकन विकण्याचा व्यवसाय करतात. म्हापसा नगरपालिका कार्यालयात आज जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या