समु्द्रकिनाऱ्यावर फिरायला जाताय..थांबा, पुढे धोका आहे

गोम्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 डिसेंबर 2020

रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर काल फिरण्यासाठी गेलेले सहा पर्यटक समुद्रात बुडाले. त्यापैकी तीन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर उर्वरित तिघांना वाचवण्यात स्थानिक यशस्वी झाले होते.

दाभोळ (रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर काल फिरण्यासाठी गेलेले सहा पर्यटक समुद्रात बुडाले. त्यापैकी तीन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर उर्वरित तिघांना वाचवण्यात स्थानिक यशस्वी झाले होते. आंजर्ले बीचवर यापूर्वीदेखाल अशा घटना घडल्या असल्याने हा समुद्रकिनारा धोकादायक असल्याचे म्हटले जाते. पर्यटनाचा मोसम सुरू झाला, की अशा अनेक घटना आपल्या कानी येतात. अशा घटना टाळण्यासाठी त्या समुद्रकिनाऱ्याबद्दल आधीच माहिती करून घेण्याची आणि अनावश्यक स्टंट न करण्याची गरज आहे.

 

रत्नागिरीच्या आंजर्ले बीचवर पर्यटक पाण्यात ज्या ठिकाणी बुडाले, तिथे मोठा खळगा तयार झाल्याचे निदर्शनास आले. पर्यटकांना समुद्रात गेल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. अशा परिस्थितीत पोहण्याची त्यांना सवयही नसते. अशा परिस्थितीत पर्यटक वाहून जाण्याची जास्त शक्यता असते. तेथील स्थानिक लोक कोणाला समुद्रात पोहू देत नाहीत, मात्र हे पर्यटक तेथेच गेले आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले, अशी प्रतिक्रिया बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनय केळस्कर यांनी दिली. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी पोहायला गेलेल्या ५ महिला पर्यटकांना बुडताना आम्ही वाचवले होते. स्थानिक लोकांना समुद्राची माहिती असते. नेमका धोका माहिती असतो, मात्र पर्यटकांचा उत्साह त्यांच्या जिवावर बेततो. त्यामुळे, पर्यटकांनी मजेची शिक्षा होणार नाही ना, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 

अधिक वाचा :

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन 

संबंधित बातम्या