कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती आता एका क्लिकवर

तेजश्री कुंभार
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. सध्याच्या ऑनलाईन शिक्षणाची गरज लक्षात घेता कौशल्य विकास खात्याकडून तरुणांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कौशल्य अभ्यासक्रमाची माहिती युवकांपर्यंत पोहचावी म्हणून ऑनलाईन यंत्रणा आज सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास आणि उद्योजिकता मंत्री विश्वजित राणे, संचालक दीपक देसाई आणि मान्यवर उपस्थित होते.

पणजी
ऑनलाईन यंत्रणेमुळे युवकांना या अभ्यासक्रमासाठी अर्जही करता येणार आहे. शिवाय माहितीही मिळणार असून त्यांना यासाठी लाईनमध्ये वैगेरे उभे राहण्याची गरज नसल्याची माहिती आरोग्यमंत्रो विश्वजित राणे यांनी दिली.
सध्याच्या परिस्थितीत अनेक लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. त्यामुळे आपण आपल्या युवकांना सर्व बाजूंनी कौशल्यपूर्ण म्हणून जगासमोर आणणे आवश्यक आहे. जगातील स्पर्धेसाठी त्यांना तयार करणे आवश्यक आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आम्ही युवकांना डिजिटल आव्हानांसाठी तयार तर करणारच आहोत, पण याशिवाय त्यांच्या अभ्यासाबाबतची स्थिती, त्यांची हजेरी आणि इतर महत्वाच्या बाबींबद्दल त्यांच्या कुटुंबियांनाही कळविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली. जेल या संस्थेच्या मदतीने आम्ही ही चांगल्या प्रकारची उत्कृष्ट प्रणाली लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी यशस्वीरित्या प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या