राज्यातील कुशल मनुष्यबळाचा विचार व्हावा

dainik Gomantak
सोमवार, 4 मे 2020

राज्यातील काही प्रदेश विशिष्ट कामाच्या मनुष्यबळासाठी प्रसिद्ध होते. त्यांना पुन्हा प्रकाश झोतात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रात एकेकाळी पेडण्याच्या गवंड्यांचा दबदबा होता. कोरोना टाळेबंदीच्या काळात पुढे आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एक लाखाच्या आसपास परप्रांतीय कामगार आहेत आणि ते बहुतेक बांधकाम क्षेत्रात आहेत.

काणकोण

राज्यातील काही प्रदेश विशिष्ट कामाच्या मनुष्यबळासाठी प्रसिद्ध होते. त्यांना पुन्हा प्रकाश झोतात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रात एकेकाळी पेडण्याच्या गवंड्यांचा दबदबा होता. कोरोना टाळेबंदीच्या काळात पुढे आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एक लाखाच्या आसपास परप्रांतीय कामगार आहेत आणि ते बहुतेक बांधकाम क्षेत्रात आहेत. कौलारू घरांचा जमाना हळूहळू कालबाह्य होऊन सिमेंट क्रॉंक्रीटचा जमाना सुरू झाला आणि लोखंड बांधणी ते सिमेंट प्लास्टरिंगपर्यंतच्या कामात उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांतील कामगार राज्यात दाखल झाले. आता त्यांच्याशिवाय बांधकाम क्षेत्रात गोव्याचे पानही हलत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे परगावचे कामगार गावी गेल्यास बांधकाम क्षेत्राचे काय होणार हा प्रश्न आहे.
तीन मे पूर्वीच सरकारने बांधकाम क्षेत्राला परवानगी दिली होती. काही कामगार कामावरही जायला लागले होते. मात्र, परप्रांतीय कामगारांना गावी जाण्याची मुभा दिल्याने कामावर जात असलेले कामगारही आपल्या कुटुंबियांच्या काळजीपोटी गावी जाण्यासाठी तयारी करू लागले आहेत. एकमेव श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातून सुमारे पावणे दोनशे कामगारांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला असल्याचे लॉकडाऊन काळात त्यांच्यापर्यंत शिधा पोचवण्यास महत्वाची भूमिका बजावलेले श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील समाज कार्यकर्ते शिरिष पै व विनय तुबकी यांनी सांगितले. पालिका क्षेत्रातही परप्रांतीय कामगार आहेत, त्यांनीही आपल्या गावी परत जाण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ऐन बांधकाम काळात काणकोणात कामगारांची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

कौशल्यपूर्ण मनुष्यबळाला गोवा
का मुकला; सिंहावलोकनाची गरज
पेडण्याचे गवंडी, म्हापसा, माशेलचे पेंटर, काणकोणचे सुतार सध्या गेले कुठे या कौशल्यपूर्ण मनुष्यबळाला गोवा का मुकला याचा या काळात सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. पेडणेच्या गवंड्यांनी पोर्तुगीज काळात सिमेंट नसताना चुन्याच्या साह्याने चिऱ्याच्या कमानी रचून बांधलेले पूल आजच्या घडीसही राज्यात आहेत. बोरी येथील जुन्या पुलाजवळचा कमानीचा पूल, शिरदोन येथील पूल, रायबंदर पाटो याची साक्ष देत आहेत. येथील चित्रकारांनीनी देवालये व अन्य सार्वजनिक ठिकाणी चितारलेली चित्रे आजही त्यांची महती सांगत आहेत. काणकोण तालुक्यातील खास करून पैंगीण भागातील सुतारांनी उभारलेली लाकडी कमानीची छप्परे खिळ्याचा वापर न करता दोन लाकडी तुळया जोडण्याचे कसब त्याच्या सुतारकामाची विशेषता दाखवतात.

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात अभ्यासक्रम
पूर्ण केलेले कारागिर गेले कुठे?
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे. त्या केंद्रातून प्लंबरचा अभ्यासक्रम शिकवला जातो. मात्र, सध्या बांधकाम क्षेत्रात असलेले परप्रांतीय प्लंबर पाहिल्यास या प्रशिक्षण केंद्रातून शिकून बाहेर पडलेले प्लंबर प्रशिक्षणार्थी कुठे गेले हा प्रश्न येतो.

संबंधित बातम्या