नभ ओथंबून आले!

Dainik Gomantak
शनिवार, 25 जुलै 2020

निळ्या निळाईला
लाल लालिम्याचे कोंदण
नभातील विभ्रम
नयनी साठले

निळ्या निळाईला
लाल लालिम्याचे कोंदण
नभातील विभ्रम
नयनी साठले
क्षितिजावर रंगांची लाली
नभी सजली न्यारी
सूर्यास्ताच्या निशिगंध उजळे
वनराईची काळी नक्षी
घरट्यात पक्षी विसावले
रात्र उजळून येईल आता
कवेत लपवून चंद्राला
ढग ओथंबले आकाशी
ही सौंदर्याची किमया
मनी मानसी मोही
वाटे ही संध्या
न मावळू दे कधी,
न मावळू दे कधी....
- नितीन कोरगावकर

 

संबंधित बातम्या