करंजाळे किनारा पुन्हा काळवंडला!

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

करंजाळे येथील समुद्र किनारा पुन्हा एकदा काळवंडला आहे. या किनाऱ्यावर कोळशाचे लहान तुकडे आणि तेलगोळे वाहून आले आहेत. 

पणजी: करंजाळे येथील समुद्र किनारा पुन्हा एकदा काळवंडला आहे. या किनाऱ्यावर कोळशाचे लहान तुकडे आणि तेलगोळे वाहून आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी राज्यातील काही दिनाऱ्यावर घरगुती वापराच्या हलक्या कोळशाचे तुकडे आढाळल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे किनाऱ्यावर कोळशाचे तुकडे किंवा रसायनमिश्रीत लहान तेलगोळे येत आहेत. करंजाळे किनाऱ्यावर आजही काळ्या रंगाचा थर दिसून आला. एकेकाळी सोनेरी किनारे म्हणून गोव्यातील किनाऱ्यांकडे पाहिले जात होते, परंतु अलिकडे सोनेरी अशा काही किनाऱ्यांचे सौंदर्य आता लुप्त होत आहे.

आणखी वाचा:

गोवा मुक्ती संग्रामाला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या घटना -

 

संबंधित बातम्या