Smart City Panjim: जनतेच्या पैशातून फुकटचे दौरे थांबवा

जनतेच्या पैशातून होणारे ‘फुकटचे दौरे’ थांबवा, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगावला आहे.
Panjim |Smart City
Panjim |Smart CityDainik Gomantak

Smart City Panjim: सुमारे 600 कोटी खर्चूनही स्मार्ट सिटी कामाच्या घोळामुळे पणजीतील नागरिकांची गैरसोय होत आहे. अशातच गोवा विधिमंडळ खात्याला मंत्री, आमदार आणि नोकरशहांना एका दिवसात मध्य प्रदेशचा दौरा करून ‘स्मार्ट’ करायचे आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, शिष्टमंडळाच्या यादीत पणजीच्याच आमदाराचा समावेश नाही. जनतेच्या पैशातून होणारे ‘फुकटचे दौरे’ थांबवा, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगावला आहे.

22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत 11 आमदारांच्या मध्य प्रदेश दौऱ्याबद्दल गोवा विधिमंडळ खात्याने जारी केलेल्या परिपत्रकावर प्रतिक्रिया देताना आलेमाव यांनी हा दौरा वायफळ खर्च असल्याचे सांगत सरकारवर सडकून टीका केली.

आपल्याकडे विधानसभेतील प्रश्नांना दिलेली उत्तरे आहेत, ज्यात समाजकल्याण खात्याचे लाभार्थी, गरीब खेळाडूंना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, असे सांगितले आहे. पण वायफळ खर्चासाठी निधी असल्याचे दिसते.

Panjim |Smart City
Green School: देशातील पहिली ग्रीन शाळा गोव्यात सुरू

प्रकल्पाचे ऑडिट करा!

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास महामंडळाचे (आयपीएससीडीएल) ऑडिट झाले आहे की नाही, हे सरकारने उघड करावे आणि ऑडिट केलेला अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकल्पाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

उलट त्यांनाच आमंत्रित करा!

गोव्यातील शिष्टमंडळ बाहेर नेण्यापेक्षा इतर राज्यांतील शिष्टमंडळांना पणजीत आमंत्रित करावे आणि काहीही न करता जनतेचा पैसा कसा वाया जाऊ शकतो, हे त्यांना दाखवावे. यामुळे पर्यटनालाही मदत होऊ शकते, अशी बोचरी टीका आलेमाव यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com