Panaji Smart City Work: ‘स्‍मार्टसिटी’च्या गलथान कामांमुळे नागरिकांच्‍या जिवाला धोका; काँग्रेस पक्षाची पोलिसांत धाव

दोषींवर कारवाईची अधीक्षकांकडे मागणी
Panaji Smart City
Panaji Smart CitySandip Desai

Panaji Smart City Work: राजधानीत इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडतर्फे सुरू असलेल्या गलथान कामांमुळे जनतेच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे ‘आयपीएससीडीएल’ (स्‍मार्टसिटी)विरोधात कंपनी कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असा मागणीअर्ज काँग्रेस पक्षाने आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे केला आहे.

त्‍याशिवाय बांधकाममंत्री व मुख्‍यमंत्री यांच्‍या परस्‍पर विधानांमुळे नागरिकांतून प्रचंड चीड व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

Panaji Smart City
Kiran Kandolkar : 'कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लोकसभा लढविण्यास इच्छुक'

पणजीत स्‍मार्टसिटीची तसेच मलनिस्सारणाची कामे पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर थांबवण्‍यात येणार असली तरी शहरात पाणी तुंबण्‍याची समस्‍या उद्भवू शकते, असा पुनरुच्‍चार सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी सोमवारी केला होता. तर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीला कोणताही धोका नाही, असे विधान केले होते.

सरकारातील दोन जबाबदार व्‍यक्‍ती परस्‍परविरोधी विधाने करतात, याचाच अर्थ नागरिकांची दिशाभूल चालली आहे, अशी दृढ भावना नागरिकांची बनली आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते एल्विस गोम्स आणि जॉन नझारेथ यांनी स्‍मार्टसिटी कामांविषयी आक्षेप नोंदवत पोलिस अधीक्षकांना अर्ज सादर केला आहे. त्‍यात म्हटले आहे की, आयपीएससीडीएलद्वारे स्मार्ट सिटी आणि अमृत मिशनद्वारे कामे सुरू आहेत. या दोन्ही उपक्रमांची अंमलबजावणी संशयास्पद आहे.

आत्तापर्यंत पणजीतील आणि येथे येणाऱ्या जनतेला, तसेच पर्यटकांना अनेक त्रास सहन करावे लागले आहेत. परंतु महत्त्वाचा त्रास हा पावसाळ्यात सोसावा लागणार आहे. पावसाळ्यात कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होईल, हे आता सांगता येत नसले तरी जनतेचा जीव धोक्यात येऊ शकतो.

त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तेचीही हानी होऊ शकते. पोलिस खात्याने आमच्या अर्जाची दखल घेऊन त्याबाबत पाऊल उचलावे, अशी आमची मागणी असल्याचे एल्विस गोम्स यांनी सांगितले.

अबब! ११०० कोटी खर्च

  • काँग्रेसने म्‍हटले आहे की, ‘आयपीएससीडीएल’कडून मिळालेल्या माहितीनुसार ४९ कामे सुरू आहेत. या कामांसाठी ११०० कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च आला आहे.

  • निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात न आल्याने, सतत उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येणाऱ्या पावसात नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.

  • कामांत गुणवत्तेशी तडजोड करण्यात आली आहे. या कामात पारदर्शकता नाही. सल्लागार, कंत्राटदार कोणत्याही निश्‍चित कृती आराखड्याशिवाय कामे करीत आहेत.

महापौरांना चर्चेचे आव्हान

स्मार्ट सिटी पणजीत झालेली कामे, भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांचे हाल यावर जाहीर चर्चेसाठी महापौर रोहित मोन्सेरात यांनी यावे. या चर्चेसाठी तुम्ही कोणतेही सार्वजनिक ठिकाणी आणि वेळ ठरावा, त्यावेळी आपण येऊ, असे आव्हान आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी ट्विटद्वारे दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com