Smart City Work: स्मार्ट सिटीची कामे अद्याप अपूर्णच; राजधानी पणजीत गटार सफाई सुरूच

मे निम्मा उलटूनही पूर्तता नाही
Panaji Smart City
Panaji Smart CityPramod Yadav

Panaji Smart City: मे महिन्याचा पंधरावडा संपला तरी राजधानी पणजी महानगरपालिकेची गटार सफाईची कामे सुरूच आहेत.

दोना पावला ते रायबंदर परिसर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येतो. साधारण फेब्रुवारीपासून गटार सफाईच्या कामांना सुरुवात होते, परंतु एका बाजूला ‘स्मार्ट सिटी’मुळे ३०० मीटर गटारांची सफाई करण्याचे महापालिका कर्मचाऱ्यांचे काम वाचले आहे. तरीही सफाई कामगारांना उर्वरित काम उरकता आले नाही.

Panaji Smart City
Rain Water Harvesting : ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी मिळते 50 टक्के अनुदान!

अवकाळी पाऊस पडला नाही, म्हणून अन्यथा सध्या ज्या गटारांची सफाई केली आहे, त्यातून निघालेली माती व इतर कचरा पाहता गटारे तुंबून ती घाण रस्त्यावर आली असती. विशेष बाब म्हणजे या सर्व कामांची आयुक्त ग्लेन मदेरा, महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक हे त्रिकुट वारंवार पाहणी करताना दिसत होते. परंतु आता सुरू असलेल्या सांतिनेज परिसरातील गटारांच्या सफाई कामांकडे पर्यवेक्षकाशिवाय कोणीच फिरकत नाही.

गटारे साफसफाई करताना यापूर्वी गटारांमध्ये विविध वाहिन्यांची आडकाठी दिसून आली आहे. शिवाय काही ठिकाणी गटारातच वाहिन्यांचे गुंडाळे लपवून ठेवल्याचेही दिसून आले आहेत. ज्या कंपन्यांच्या वाहिन्या अशा स्थितीत दिसल्या, त्यावर महानगरपालिकेने काय कारवाई केली कोणास ठाऊक.

याशिवाय धोकादायक झाडांच्या फांद्याही हटविण्याची कामे सुरू आहेत. आज दुपारी आल्तिनो येथील जॉगर्स पार्कजवळील गुलमोहोराच्या रस्त्याच्या बाजूला झुकलेल्या धोकादायक फांद्या छाटण्यात आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com