Covid-19 Goa: गोयेंकारांना सेवा देणाऱ्या 1624 पोलिसांना कोरोना संसर्ग

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

Covid-19 Goa आजपर्यंत पोलिस खात्यात पोलिस महासंचालकापासून ते कॉन्स्टेबल पदापर्यंत 1624 जण कोरोना बाधित झाले. यापैकी 1561 जण त्यातून बरे होऊन कामावर रूजू झाले. तिघांचा मृत्यू झाला तर अजूनही सध्या 60 जण सक्रीय आहेत.

पणजी: राज्यातील(Goa) कोरोना योद्ध्यांपैकी डॉक्टर्स(Doctors) व आरोग्य कर्मचाऱ्यांपाठोपाठ पोलिसांचा(Police) क्रमांक लागतो. कोरोना संसर्गाच्या(Covid-19) काळात लोकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागताना अनेकांना संसर्ग झाला. आजपर्यंत पोलिस खात्यात पोलिस महासंचालकापासून ते कॉन्स्टेबल पदापर्यंत 1624 जण कोरोना बाधित झाले. यापैकी 1561 जण त्यातून बरे होऊन कामावर रूजू झाले. तिघांचा मृत्यू झाला तर अजूनही सध्या 60 जण सक्रीय आहेत. कोरोना बाधित झालेल्यांमध्ये 7 पोलिस अधीक्षक, 6 उपअधीक्षक, 27 निरीक्षक व 121 उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.(So far 1624 people have been infected with corona in the Goa police department)

कोरोना काळात पोलिसांनी लोकांना घराबाहेर पडू नये यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून कोरोना संसर्ग किती धोकादायक आहे याची जनजागृती होती. उपअधीक्षक ते पोलिस कॉन्स्टेबल्स पदाच्या काही कर्मचाऱ्यांनी कोरोना संसर्गापासून सावध कसे राहावे याबाबतची हिंदी व कोकणीतून गीते सादर केली होती. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरात तसेच गावागावामधून जनजागृती करत असताना काही पोलिसांना कोरोना संसर्गाला सामोरे जावे लागले होते. त्यामध्ये पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा तसेच पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य हेही सुटले नव्हते. मात्र पोलिसांनी मोठ्या धाडसाने या संसर्गाची फिकीर न करता काम सुरूच ठेवले. कोरोना संसर्गाची साथ असल्याने टाळेबंदीच्या काळात लोकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास प्रतिबंध केला होता. 

Goa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर 

राज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव गेल्यावर्षी मार्च 20 मध्ये सुरू झाल्यापासून पोलिसांना नियमित रजा बंद करण्यात आल्या होत्या तर काही तातडीच्या व महत्वाच्या कामासाठीच ही रजा मंजूर केली जाईल असा फतवाच पोलिस महासंचालकांनी काढला होता. त्यामुळे बहुतेक पोलिसांचे पोलिस स्थानकच घर बनले होते. सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस कॉन्स्टेबल पदापर्यंतच्या पोलिसांना झाला व त्यांची संख्या सुमारे 1400 होती. त्यातील 1348 बरे होऊन अजून 53 जण उपचार घेत आहेत. काही मंत्र्यांचे सुरक्षारक्षक असलेल्या 6 जणांना कोरोना संसर्ग झाला होता ते सर्वजण बरे झाले आहेत. 

Covid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू 

पोलिसांना नेहमीच विविध कामांमध्ये साथ देणारे 81 गृहरक्षक बाधित झाले होते त्यापैकी 78 कोविडमुक्त झाले आहे तर 3 जण गृह अलगीकरणात आहेत. पोलिस खात्यातील प्रशासकीय विभागातील 34 कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले होते. त्यापैकी 3 जण अजून उपचार घेत आहेत. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये हल्लीच निधन झालेल्या माजी पोलिस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांचा समावेश आहे. 
 

 पद  बाधित   बरे झाले  मृत्यू   सक्रीय 
अधीक्षक 7 7 - -
उपअधीक्षक 6 6 1 -
निरीक्षक  26 26 1 -
उपनिरीक्षक 121 119 - 2
सहा. उपनिरीक्षक 134 128 - 6
हवालदार 365 355 - 10
कॉन्स्टेबल्स   799 764 - 35
सुरक्षा पोलिस 6 6 - -
प्रशिक्षणार्थी पोलिस 41 41 - -
प्रशासकीय कर्मचारी 34 29 2 3
गृहरक्षक   81 78 - 3
एकूण 1624      

 

संबंधित बातम्या