Panchayat Election: अखेरच्या दिवशी 1,499 अर्ज, एकूण 6,256 अर्ज दाखल ; उद्या छाननी

27 जुलै अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस
Goa Panchayat Election News
Goa Panchayat Election NewsDainik Gomantak

पंचायत निवडणूकीसाठी (Panchayat Election) आज अखेरच्या दिवशी (Last Day Of Nomination) सर्व तालुक्यातून 1,499 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजवर उत्तर आणि दक्षिण गोवा (North And South Goa) दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 6,256 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या म्हणजेच मंगळवारी (दि.26) या अर्जांची छाननी केली जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील बारा तालुक्यातील 186 पंचायतीसाठी निवडणूक प्रक्रियेचा अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातून आज एकूण 79 अर्ज दाखल झाले असून, आजवर 515 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. बिचोली तालुक्यात एकूण 488 अर्ज प्राप्त झाले आहेत. सत्तरी तालुक्यातून 355 अर्ज, बारदेश 1263 अर्ज आणि तिसवाडी तालुक्यातून 691 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

तसेच, दक्षिण गोव्यातून फोंडा तालुक्यात 733 अर्ज, धारबांदोरा 172 अर्ज, सांगे 211 अर्ज, सासष्टी 994 अर्ज, केपें 282 अर्ज, मुरूगाव 311 अर्ज आणि कोणाकोण 241 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Goa Panchayat Election News
Election Candidature: निवडणुकीसाठी आतापर्यंत 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल

उत्तर आणि दक्षिण गोवा दोन्ही जिल्ह्यात मिळून 186 पंचायतीसाठी एकूण 6,256 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या उमेदवारी अर्जांची मंगळवारी (26 जुलै) छाननी होणार आहे. 27 जुलै अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 10 ऑगस्ट रोजी राज्यातील 186 पंचायतीसाठी मतदान (Voting) होईल आणि 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी (Vote Counting) होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com