...तर सांगेत आयआयटी प्रकल्पाचे स्वागत होईल

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

 सांगे येथे आयआयटी प्रकल्प आणल्यास त्या प्रकल्पाचे स्वागतच केले जाईल अशी माहिती सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

पणजी : सांगे येथे आयआयटी प्रकल्प आणल्यास त्या प्रकल्पाचे स्वागतच केले जाईल अशी माहिती सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

ते म्हणाले, गोव्याला आयआयटी प्रकल्पाची गरज आहे. सांग्यात जमीन आहे. त्यामुळे हे शैक्षणिक केंद्र सांग्यात आणल्यास आम्ही स्वागतच करू. मेळावलीतून तो प्रकल्प हलवावा, असे मी म्हणत नाही. पण, आयआयटी प्रकल्प राज्यातच रहायचा असेल तर सांग्यात जागा आहे हे आम्ही सरकारला सांगू इच्छितो. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात सरकारी व वन खात्याची, सोसायटीची  अशा तीन जागा दाखवल्या होत्या. एका जागेबाबत मतैक्य झाले होते. त्या जमिनीवर दोघांनी अतिक्रमण केले आहे. त्यांचा प्रश्न सोडवल्यास तेथे आयआयटी प्रकल्प साकारता आला असता.

सांग्यात आयआयटी प्रकल्पाची केवळ पायाभरणी होणे बाकी होते एवढी प्रगती झाली होती. मात्र नंतर काहीच प्रगती झाली नाही. सांग्यात मोठे कोणतेही प्रकल्प येत नाहीत त्यामुळे निदान आयआयटी सारखा प्रकल्प तरी यावा असे आम्हाला वाटते.
सांग्यात जमीन आहे. सांगेवासीयांचा आयआयटीला विरोध नाही. एक दोन अतिक्रमण केलेल्यांचा विरोध आहे मात्र त्यांच्याशी चर्चा करता येते. त्यामुळे आता जर सरकार आयआयटीसाठी नवीन जागा पाहणार असेल तर त्यांनी सांग्याचा विचार जरूर करावा.

संबंधित बातम्या