म्हणून करंझोळच्या काजरेधाट वाड्यावर करावा लागला हवेत गोळीबार...

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 मे 2021

सत्तरी तालुक्यात वनखाते, म्हादई अभयारण्य व नागरिकांमध्ये जमीन मालकी विषयावरून गेल्या अनेक वर्षांपासून तणावाची स्थिती आहे. काल (बुधवारी) पुन्हा हा तणाव दिसून आला. अडविल्यानंतर नाईलाजास्तव हवेत गोळीबार करावा लागला.

वाळपई : सत्तरी(Sattari) तालुक्यात वनखाते, म्हादई अभयारण्य व नागरिकांमध्ये जमीन मालकी विषयावरून गेल्या अनेक वर्षांपासून तणावाची स्थिती आहे. काल (बुधवारी) पुन्हा हा तणाव दिसून आला. सावर्डे पंचायत क्षेत्रातील काजरेधाट(KAJREDHAT), बंदीरवाडा(BANDIRWADA) या मार्गे वाळपई म्हादई अभयारण्याचे वनअधिकारी नारायण प्रभुदेसाई(Forest Officer Narayan Prabhudesai) व खात्याच्या वरिष्ठ अधिकारी डी. सी. एफ तेजस्वीनी(D. C. F. Tejaswini) या कृष्णापूर येथे सकाळी जात होत्या. त्यावेळी काजरेधाट येथे नारायण प्रभुदेसाई यांना लोकांची झाडे कत्तल केलेली दिसून आली.(So Kajredhats had to shoot in the air on Bandirwada )

काजरेधाट येथील महिला सरस्वती गावडे या घर साकारणीचे (घरशिवणी) काम करताना दिसल्या. त्यावेळी प्रभुदेसाईंनी सदर महिलेला घर शिवणीसाठी झाडांची कत्तल का केलीस अशी विचारणा करीत त्या ठिकाणी असलेली कोयता व अन्य साहित्य जप्त केले. या घटनेची माहिती सरस्वती गावडे यांनी गावकऱ्यांना दिली. या प्रकारामुळे लोक संतप्त झाले. त्यांनी काजरेधाट रस्त्यावर वनअधिकारी पुन्हा माघारी येण्याची ठाण मांडून वाट बघत बसले. दुपारी वनअधिकारी कृष्णापूरहून माघारी येत असताना लोकांनी त्यांची वाहने अडवून सकाळच्या प्रकाराबाबत जाब विचारला. उपस्थितांपैकी काहींनी वाहनाची चावी काढून घेतली. लोकांनी आक्रमक पावित्रा घेतल्याचे पाहून नारायण प्रभुदेसाई यांनी तीनवेळा हवेत गोळीबार केला. त्यावेळी लोक मात्र हा प्रकार पाहून भयभीत झाले.

COVID-19 Goa: 5 टक्के कोरोना रूग्णांचा पॉझिटिव्हिटी दर 50 टक्कयांपर्यंत कसा गेला?  

सरस्वती गावडे म्हणाल्या, आपण गोठाघर शिवणीचे काम करीत होते. त्यावेळी म्हादई वनखात्याचे नारायण प्रभुदेसाई यांनी येऊन आपणाकडील साहित्य जप्त केले. हरिश्चंद्र गावस म्हणाले, म्हादईचे नारायण प्रभूदेसाई हे नेहमीच पिस्तूल घेऊन फिरत असतात. आज त्यांनी लोकांसमोरच हवेत तीनेवळा गोळीबार करून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. वनखात्याला आम्ही गावात बंदी घालून देखील म्हादई वनखाते आम्हाला करंझोळ, कुमठळ, काजरेधाट, बंदीरवाडा येथील लोकांना त्रास करीत आहेत.  या घटनेत नारायण प्रभुदेसाई यांच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. दुपारी लोकांनी रस्ता अडविल्यानंतर प्रभुदेसाई यांना जोवर अटक करीत नाहीत, तोवर हटणार नाही, असा पावित्रा घेतला. त्यावेळी वाळपई पोलिसांना पाचारण करण्यात आले व चर्चा करुन नंतर वाळपई पोलिस ठाण्यात सरस्वती गावडे यांचा जबाब घेण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

गोव्यात आज सायंकाळपर्यंत ऑक्सीजन कॉन्सस्ट्रेटर होणार दाखल 

नाईलाजास्तव हवेत गोळीबार...
वनअधिकारी नारायण प्रभुदेसाई म्हणाले, आपण व वरिष्ठ अधिकारी तेजस्वीनी कृष्णापूरला जात असताना वाटेत काजरेधाटात झाडे कत्तल केलेली दिसून आली. याबाबत आपण महिलेला विचारले होते. झाडे कत्तलीचे साहित्य जप्त केले होते. दुपारी माघारी येताना लोकांनी बेकायदेशीरपणे रस्ता अडवून आम्हाला वाहनासह रोखून धरले. म्हादई अभयारण्य जतनाचे कर्तव्य आम्ही निभावत आहोत, असे असताना लोकांकडून चुकीच्या पद्धतीने काम केले जात आहे. दुपारी आम्हाला अडविल्यानंतर स्वत:चे रक्षण करण्यासाठी मला नाईलाजास्तव हवेत गोळीबार करावा लागला. स्वत:च्या बचावासाठी तो आम्हाला अधिकार दिलेला आहे. या घटनेची माहिती आम्ही सरकारी दरबारी देणार आहोत, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.

‘काजरेधाटच्या घटनेला सरकारच जबाबदार’

करंझोळच्या काजरेधाट वाड्यावर बुधवारी घडलेल्या घटनेला सरकारने जी दोन दशके निष्क्रियता पत्करली ती कारणीभूत ठरलेली आहे. स्थानिक लोकांच्या शेती बागायती आदी हक्कांचे रक्षण करीत असताना वाढती वृक्षतोड व जंगलांची जाळपोळ रोखण्यात समर्थपणे पाऊले उचलली असती तर ग्रामस्थ व म्हादई वनखाते यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला नसता. त्या लोकांना विश्वासात घेऊन अभयारण्य स्थानिक लोकांना कोणकोणत्या उपक्रमात सहभागी करून घेता येते. या पर्यायांचा विचार करण्या बरोबरच जंगलतोड रोखणे महत्वाचे आहे असे पर्यावरण तज्‍ज्ञ राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या