तुमचा कचरा घरातच ठेवा, कोरोना रुग्णाला सोसायटीची ताकिद; दक्षिण गोव्यातील धक्कादायक प्रकार

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

दक्षिण गोव्यातील अशाच एक कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या, आणि होम क्वॉरंटाइन असलेल्या अनोखा झा यांची परिस्थिती सध्या अत्यंत वाईट आहे. मागच्या आठवड्यात अनोखा झा यांना आणि त्यांच्या पतीला कोरोनाची लागण झाली असून त्या होम क्वॉरंटाइन आहे.

दक्षिण गोवा: गोव्यात इतर राज्याच्या तुलनेत कोरोनाची रूग्ण संख्या कमी असली तरी गोव्यात जे लोक कोरोना आजाराने त्रस्त आहेत त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर घाणेरड्या आणि अस्वच्छ परिस्थितीत जगावे लागत आहे.

दक्षिण गोव्यातील अशाच एक कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या, आणि होम क्वॉरंटाइन असलेल्या अनोखा झा यांची परिस्थिती सध्या अत्यंत वाईट आहे. मागच्या आठवड्यात झा यांना आणि त्यांच्या पतीला कोरोनाची लागण झाली असून त्या होम क्वॉरंटाइन आहे. ते दोघेही आपल्या घरात दोन छोट्या मुलांसोबत राहत आहे. त्या दक्षिण गोव्यातील ओसिया मॅपल लीफ, नेसाई या सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्यावर कोरोना उपचार सुरू आहे. जेव्हापासून सोसायटीमध्ये त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली तेव्हापासून त्यांच्या घरातून कचरा उचलणे सोसायटिने बंद केले आहे.

गोव्यात होणार वैद्यकीय भरती; 50 डॉक्टर, 140 परिचारिकांची कंत्राटी पद्धतीने होणार नेमणुक 

त्या होम क्वॉरंटाइन असल्याने त्यांच्या घरात कचरा साचला आहे. सोसायटीच्या मॅनेजमेंटने त्यांच्या घरातून कचरा उचलण्यास नकार दिला आहे. "तुम्ही कूणी स्पेशल पर्सन नाही आहात, सगळ्यांसाठी सारखाच नियम आहे, आणि नियमानुसार होम क्वॉरंटाइन असेपर्यंत हा कचरा तुम्हाला घरात ठेवावा लागणार आहे," असे सोसायटी मॅनेजमेंटने म्हटले आहे. त्यामुळे अनोखाला आणखी कोरोनासोबतच कचऱ्यापासून आजारी पडण्याची आणि घरात रोग पसरण्याची भिती वाटत आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे. परंतू अजूनही या घटनेची दखल प्रशासनाने घेतली नाही.  त्यांनी या संबधीची माहिती सोशल मिडियावर घरात साचलेल्या कचऱ्याचे फोटो शेअर करत दिली आहे. 

गोवा प्रशासन अशा प्रकारे डोळेझाक करत असेल तर होम क्वॉरंटाइन असणाऱ्या रूग्णांपुढे मोठी समस्या उद्भवणार आहे. कोरोना संक्रमित रूग्णांना कचऱ्यात राहावे लागेल शिवाय समाजाच्या अशा नकारात्मक दृष्टीकोनाचा सामनाही करावा लागणार आहे.
 

संबंधित बातम्या