कोविड हॉस्पिटल्समध्ये सोडेक्सोकडून पथ्यानुसार आहारसेवा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

राज्यातील आरोग्य सुविधा अद्ययावत व सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्रिमंडळाने वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

पणजी: कोविडग्रस्त रुग्णांची पोषणसुरक्षा राखण्यासाठी आरोग्य खात्याने अन्नसेवा भागीदार म्हणून सोडेक्सोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार कोविड-१९ नियंत्रणात येईपर्यंत ईएसआयसी कोविड-१९ हॉस्पिटल-मडगाव, उप-जिल्हा हॉस्पिटल-फोंडा आणि इतर कोविड हॉस्पिटल्स अशा ८०० खाटांच्या क्षमतांच्या हॉस्पिटलमध्ये पथ्यानुसार आहारसेवा देण्यासाठी सोडेक्सोची २००हून अधिक व्यावसायिक कर्मचाऱ्यांचे पथक तैनात राहणार आहे.

कोरोना लढ्यासाठी राज्यास तयार करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक उपाययोजना राबवत आहोत. रुग्णांची वाढती संख्या हातळण्यासाठी खास कोविड हॉस्पिटल्स यंत्रणा सज्ज केली आहे. तसेच आरोग्य, स्वच्छता आणि आहार सेवा देण्यासाठी अनुभवी, आंतरराष्ट्रीय पातळीवर कामाचा अनुभव असलेल्या व्यावसायिक यंत्रणा आणि सेवा भागीदार यांनाही नियुक्त केले आहे. राज्यातील आरोग्य सुविधा अद्ययावत व सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्रिमंडळाने वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

मार्च २०१९ पासून गोव्यामध्ये सोडेक्सो कार्यरत आहे.  गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमधील अन्नसेवेचा यशस्वीपणे कायापालट करण्यात सोडेक्सोला यश मिळाले आहे. यामुळे आपल्या अत्याधुनिक केंद्रीय किचन आणि चार रिटेल दालनांच्या माध्यमातून ३०० हून अधिक डॉक्टर, ७०० हून अधिक वैद्यकीय कर्मचारी, १२०० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी आणि सुमारे २००० हून अधिक लोकांना सुरक्षित, पोषक अन्नसेवा देणे शक्य झाले असून यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत झाल्‍याची माहिती सोडोक्सोकडून देण्यात आली. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या