६० ग्रॅम गांजासह सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक; गोवा पोलिसांची कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील व्होवरे पाळोळे येथे काणकोण पोलिसांनी आशिषला ताब्यात घेउन झडती घेतली. त्यात त्याच्याकडे ६० ग्रॅम गांजा आढळून आला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

मडगाव- काल (शुक्रवारी) येथे एका सॉफ्टवेअर अभियंत्याला गांजासह अटक करण्यात आली. आशिष शर्मा (वय२६) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. आशिष हा  मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील आहे. 

 संशयित आरोपी आशिष हा चेन्नई येथील एका कंपनीत कामाला आहे. टाळेबंदीच्या काळात आशिष हा गोव्याहून ऑनलाईन काम करत असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली.

राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील व्होवरे पाळोळे येथे काणकोण पोलिसांनी आशिषला ताब्यात घेउन झडती घेतली. त्यात त्याच्याकडे ६० ग्रॅम गांजा आढळून आला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा कलम २0 (ब), (अ) अंतर्गंत आशिष याच्यावर काणकोण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 

संबंधित बातम्या