'बैलपार नदीकाठच्या मातीचा भराव उचला'

शेतकऱ्यांची मागणी: ...अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा
'बैलपार नदीकाठच्या मातीचा भराव उचला'
Bailpar river project workDainik Gomantak

मोरजी: बैलपार कासारवर्णे या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या जलसिंचन खात्याच्या पंप हाऊसमुळे पावसाळ्यात समस्या निर्माण होणार आहेत. कासारवर्णे पंचायत क्षेत्रातील बैलपार नदीकिनारी जलसिंचन खात्याअंतर्गत 27 कोटी रुपये खर्च करून हे काम केले जात आहे. स्थानिक पंचायत व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा प्रकल्प उभारला जात असून, सद्यःस्थितीत नदीच्या अर्ध्या पात्रात मातीचा भराव गेल्याने नदीचे पात्र बुजण्याची शक्यता आहे. हा मातीचा भराव वेळीच उचलावा अन्यथा न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शेतकरी बाबुराव गाड, उदय महाले आणि सागर गाड यांनी दिला आहे.

 Bailpar river project work
डिचोलीतील ‘चिल्ड्रन पार्क’ ठरतेय वरदान

नदीकिनारीही मातीचा भराव मोठ्या प्रमाणात पडला आहे. या ठिकाणच्या जोड पुलाच्या बाजूला असलेली संरक्षक भिंतही कोसळली आहे. ही भिंत वेळीच पुन्हा बांधावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

जलसिंचन खात्याअंतर्गत बैलपार नदीवर पंप हाऊस बसवण्यात देण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला मिळालेले आहे. त्या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे नदीच्या पुलाच्या ठिकाणची संरक्षक भिंत मोडकळीस आली आहे. पावसाळ्यापूर्वी या भिंतीचे काम करावे, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.