गोवा समुद्रात बुडणाऱ्यांचा जीव वाचवणाऱ्या जीवरक्षकांना सेवेमध्ये कायम करा: चोडणकर

  Solve the problem of unemployment of lifeguards  Girish Chodankar said to goa government
Solve the problem of unemployment of lifeguards Girish Chodankar said to goa government

पणजी: समुद्रात बुडणाऱ्यांचा जीव वाचवणारे जीवरक्षक गेल्या १४ महिन्यांपासून बेरोजगार आहेत. त्यांनी सेवेत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची सेवा कायम करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सरकारकडे केली.

 
गेल्या आठवड्यापासून दृष्टी कंपनीच्या माजी जीवरक्षकांनी पणजीतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे सुरू केली आहेत. चोडणकर यांनी आज संध्याकाळी या जीवरक्षांची भेट घेऊन काँग्रेस पक्ष त्यांच्याशी खंबीर उभा राहील असे आश्‍वासन दिले. त्यांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी गोवा सरकारने केलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यास तुमच्या या आंदोलनात पाठिंबा दिला जाईल असे सांगितले. यावेळी पत्रकारांशी बोलताना चोडणकर म्हणाले की, हे जीवरक्षक दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे जीवन धोक्यात घालतात, पण या बदल्यात त्यांना सरकारकडून फक्त अन्याय मिळत आहे. त्यांच्याकडे असे वागणे चुकीचे आहे. यावेळी संजय सरमळकर आणि स्वाती शेट केरकर उपस्थित होते.


चोडणकर यांनी जीवरक्षकांना आपला पाठिंबा देताना हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. जीवरक्षकांना संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने त्वरित त्यांना नियमित केले पाहिजे. गोवा पर्यटनस्थळ आहे आणि पर्यटक आनंद घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करतात, म्हणूनच समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांची परिपूर्ण गरज आहे. जर या जीवरक्षकांना समुद्र किनाऱ्यावर तैनात करण्यास सरकार अपयशी ठरले तर गोवा पर्यटनाचा व्यवसाय गमावेल. या एका कारणामुळे पर्यटकांपर्यंत चुकीचा संदेश जाईल, असे ते म्हणाले. 


समुद्रकिनाऱ्यांवर आवश्‍यक असलेली जीवरक्षकांची संख्या तैनात नाही व पुरेपूर सेवा दिली जात नसली तरीही लाईफ सेव्हिंग दृष्टी कंपनीला सरकारकडून पैसे दिले जातात. यामध्ये पर्यटनमंत्र्यांचे कमिशन असल्यामुळेच हे सर्व घडत आहे. या सरकारने प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com