Ferry Boat: राज्यातील काही फेरीबोटींची अवस्था बिकट

सुरक्षिततेचा प्रश्‍न: गंजलेल्या बोटीतूनच दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू
Ferry Boat
Ferry BoatDainik Gomantak

Ferry Boat राज्यातील फेरीबोट ही एक महत्त्वाची सेवा आहे. त्या फेरीबोटीतून दररोज हजारो प्रवाशी ये-जा करतात. परंतु काही मार्गावरील फेरीबोटींची अवस्था योग्य नाही. त्यामुळे फेरीबोटीत येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्‍न उपस्थित होत आहेत. एका दक्ष नागरिकाने या फेरीबोटीविषयी काही प्रश्‍न उपस्थित करीत ‘गोमन्तक''च्या माध्यमातून समस्या पुढे आणल्या आहेत.

पोर्तुगीज काळात जहाज बांधणारी जगातील सर्वोत्तम बंदरे होती, आता हा जहाज बांधणी व्यवस्था कुठे गेला आहे. फेरीबोटीची स्थिती पाहिल्यानंतर आपण आपले कौशल्य गमावले आहे काय, असाही सवाल त्यांनी केला आहे. त्यांच्या मते फेरीबोटीची स्थिती बिकट आहे.

या बोटी गंजलेल्या आहेत. इंजिनचे एक्झॉट उघडेच आहे. त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असल्यामुळे या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या लोकांना, लहान मुलांना किंवा गरोदर महिलांसाठी त्या धोकादायक ठरू शकते.

मशीनद्वारे तिकीट देण्याची पद्धत सुरू आहे. परंतु ही पद्धत फेरीबोट सेवेत नाही, उलट फक्त कागदी तिकीट दिले जाते, याकडेही संबंधिताने लक्ष वेधले आहे.

इंजिन ऑईलमुळे जलप्रदूषण

फेरीमध्ये वाहने उभी करणाऱ्यांमध्ये शिस्त नसल्याचे दिसून येते. कोणीही कशीही आपली दुचाकी उभी करतो. त्याशिवाय बसण्यासही योग्य व्यवस्था नसल्याचे दिसून येते.

त्याशिवाय या फेरींची अवस्था पाहिल्यानंतर त्यातील इंजिन ऑईल थेट समुद्रात जात असल्याने नद्यांचे प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर काही मार्गावर फेरीबोटीसाठी अर्धातासाचा वेळ लागतो. अशावेळी महिलांसाठी फेरीबोटीत स्वच्छतागृहाची सोयही नाही.

प्रतीक्षालयाचा अभाव

फेरीतील प्रवाशांसाठी प्रतीक्षालय किंवा बर्थवर बसण्याची व्यवस्था नसते, असेही दिसून येते. बऱ्याच फेरीबोटीत डिझेल टाकीजवळ अग्निशामक यंत्र नाही, असेल तर ते वरील रुममध्ये ठेवले जाते.

त्याचबरोबर ज्या ठिकाणी फेरीबोट थांबविली जाते, त्या जेटीवरील फेरीबोट थांबविण्याचे (लँडिग क्षेत्र) ठिकाणांची स्थिती बिकट आहे. भरतीच्यावेळी फेरीबोटीतून वाहने काढताना वाहनधारकांना कठीण होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

विधायक बदल करा

1 फेरीबोटी कित्येक दिवसांपासून सेवेत कार्यरत आहेत. काही एक-दोन घटना किरकोळ घडल्या असतील. परंतु इंजिनच्या ठिकाणी हवा जावी, म्हणून आत हवा घेऊन बाहेर गरम हवा सोडणारे एक्झिस्ट फॅन बसविलेले असतात.

2 फेरीबोटीत प्रवाशांना बसण्याची सोय असते. परंतु फॅनच्या बाजूच्या ठिकाणी प्रवाशांना बसण्यास कोणतीही सोय नसते. गर्दी झालीतर लोक त्या बाजूने उभे राहतात. त्यामुळेे त्यांना नाहक त्रास सहन कराव लागतो, शिवाय इंजिनाची धगही लागते.

3 थेट इंजिनकडे डिझेल सुरक्षित वाहिनीतून नेले जाते. त्याशिवाय ज्या फेरीबोटींबाबत तक्रारी येतात, त्यांची दुरुस्ती करण्यासाठी त्या आणल्या जातात. ज्या काही सुविधा किंवा बदल हवे आहेत, ते करणे शक्य आहे, असे फेरीबोट कार्यशाळेचे प्रमुख विक्रमसिंगराजे भोसले यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com