मद्यपी पर्यटकांचे गोवा सरकारला आव्हान...

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

मिरामार समुद्र किनाऱ्यावर मद्यपान करून काही पर्यटकांनी गोवा सरकारच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

मिरामार: मिरामार समुद्र किनाऱ्यावर मद्यपान करून काही पर्यटकांनी गोवा सरकारच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. समुद्र किनारी खुलेआम मद्यपान करून काही पर्यटक गोवा सरकारला आव्हान देत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान किंवा मद्यपान केल्यास १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद सरकारच्या नियमांवलीमध्ये आहे. मात्र ही नियमावली फक्त कागदावरच राहिल्याचे निदर्शनास आले आहे. सरकार याकडे गांभिर्याने पाहिल का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

बेन्झ कंपनीची जगातील पहिल्या मॉडेलची मोटारगाडी मडगावात -

सध्या सलग सुट्यांमुळे गोव्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मास्क वापरण्याचे सौजन्यही काही पर्यटक दाखवत नसल्यामुळे हा पर्यटकांचा स्वैराचार स्थानिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या