Sonali Phogat यांच्या कुटुंबीयांनी केली सीबीआय चौकशीची मागणी

सोनाली फोगट प्रकरणावरुन राज्यात उलट - सुलट चर्चा
Sonali Phogat
Sonali Phogat Dainik Gomantak

BJP Leader From Haryana: हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या कुटुंबीयांनी गोव्यातील त्यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 42 वर्षीय सोनाली फोगट यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, सोनाली फोगट यांच्या बहिणीने म्हटले आहे की, 'तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे कुटुंबीयांना मान्य केले नाही.' सोनाली यांची बहीण रमण यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, "माझ्या बहिणीला हृदयविकाराचा झटका आला नसावा. ती खूप तंदुरुस्त होती. आम्ही सीबीआयकडून (CBI) योग्य तपासाची मागणी करतो. तिचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले यावर माझे कुटुंबीय विश्वास ठेवायला तयार नाहीत. तिला अशी कोणतीही वैद्यकीय समस्या नव्हती."

Sonali Phogat
CM Pramod Sawnt: सोनाली फोगट यांच्या मृत्यूबाबत प्रमोद सावंत यांनी सोडले मौन!

"तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तिचा मला फोन आला होता. तिने काहीतरी चुकीचे घडत असल्याचे सांगितले होते. नंतर तिने कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर तिने फोनच उचलला नाही," असेही रमण म्हणाल्या.

दुसरीकडे, आपल्या ग्रुपसोबत गोव्याला (Goa) आलेल्या सोनालीला प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबद्दल विचारणा केली असता गोव्याचे पोलीस प्रमुख जसपाल सिंग (Jaspal Singh) यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'यात काहीही चुकीचे नाही.'

Sonali Phogat
Sonali Phogat: भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

तसेच, सोनाली एक प्रसिध्द TikTok कर होती. भाजपमध्ये येण्यापूर्वी तिने 2006 मध्ये टीव्ही अँकर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. 2016 मध्ये तिने एका टीव्ही शोद्वारे अभिनयात पदार्पण केले होते. तर 2019 मध्ये एका वेब सीरिजमध्येही ती दिसली होती. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती.

शिवाय, सोनाली फोगटने 2019 ची हरियाणा (Haryana) निवडणूक भाजप उमेदवार म्हणून लढवली होती. मात्र त्यांना काँग्रेस उमेदवार कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. बिश्नोई यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केले होते.

सोनाली फोगट प्रकरणावरुन गोव्यात उलट - सुलट चर्चा

याबाबत बोलताना आपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष सिद्धेश भगत यांनी मागणी केली आहे की, भाजप नेत्या सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेत ही चौकशी व्हावी तसेच मुख्यमंत्री आपल्या कार्यालयात बसत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू आला असे शवविच्छेदन अहवावापूर्वी केसे म्हणू शकतात असे ते म्हणाले.

त्यांच्याकडून असे निष्काळजीपणाचे वक्तव्य कुठेही होणार नाही तसेच राज्याचे नाव खराब होईल याबाबत काळजी घ्या असे ही ते यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com