Sonali Phogat मृत्यू प्रकरणाच्या CBI चौकशीवर कुटुंबीयांची आली प्रतिक्रिया

Sonali Phogat Death Case: भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला आहे.
Sonali Phogat
Sonali PhogatDainik Gomantak

Sonali Phogat Death Case Handover CBI: भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. सोनाली फोगट यांच्या कुटुंबीयांनी सीबीआयकडून तपास करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यावर सोनाली फोगट यांचा भाऊ रिंकू फोगट म्हणाला, "आमचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत होते." यामागे 'षड्यंत्र' असल्याचा संशय आहे. सीबीआय चौकशीतूनच हे उघड होऊ शकते. एजन्सी या प्रकरणाची सखोल चौकशी करेल, असा विश्वास रिंकू यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी सीबीआय चौकशीची शिफारस करणारे पत्र लिहिले होते, त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. हरियाणातील हिसार येथील भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) (43) यांचा गेल्या महिन्यात गोव्यात (Goa) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या प्रकरणी सुधीर सांगवान, सुखविंदर सिंग आणि अन्य तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

Sonali Phogat
Sonali Phogat मृत्यू प्रकरणाच्या CBI चौकशीला केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली मान्यता

दुसरीकडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, ''गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आहे. त्यांना काही पुरावेही मिळाले आहेत. परंतु हरियाणातील (Haryana) त्यांच्या कुटुंबीयांच्या मागणीमुळे आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे.''

Sonali Phogat
Sonali Phogat Case : सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी

हरियाणा सरकारनेही सीबीआय चौकशीची मागणी केली होती

विशेष म्हणजे, हिसारमधील राष्ट्रीय खाप महापंचायतीने सरकारला पक्षाच्या नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी 23 सप्टेंबरपर्यंत सीबीआय चौकशीची शिफारस करण्याचा अल्टिमेटम दिला होता. सरकारने तसे न केल्यास जनआंदोलन सुरु करण्याची धमकी महापंचायतीकडून देण्यात आली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी गुरुग्राममध्ये सांगितले होते की, 'हरियाणा सरकारलाही या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी हवी आहे.' फोगट यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, तर गोवा पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात हरियाणातील हिसार, रोहतक आणि गुरुग्रामलाही भेट दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com