Sonali Phogat यांच्या हत्येमागे नेमका कोणता हेतू होता? CBI करतेय 24X7 तपास

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगट खून प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
Sonali Phogat
Sonali PhogatDainik Gomantak

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगट खून प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. गेल्या 4 दिवसांपासून सीबीआयचे पथक गोव्यात असून सोनाली फोगट खून प्रकरणाचा हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची टीम रात्रंदिवस काम करत असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. गोवा पोलिसांकडून प्रकरण हस्तांतरित झाल्यानंतर सीबीआयला मिळालेल्या सर्व कागदपत्रांचे आणि अहवालांचे सखोल विश्लेषण केले जात आहे.

दरम्यान, सोमवारी सीबीआय (CBI) अधिकाऱ्यांनी त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये काही लोकांचे जबाब नोंदवले, जे घटनेच्या दिवशी ग्रँड लिओनी रिसॉर्ट आणि कर्लेज क्लबमध्ये उपस्थित होते. याआधी शनिवारी सीबीआयने ग्रँड लिओनी रिसॉर्टमध्ये सुमारे 10 तास संपूर्ण कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवले, सोनाली फोगट यांच्या खोलीचे आणि सुधीरच्या खोलीचे थ्रीडी मॅपिंग तसेच व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीही करण्यात आली.

Sonali Phogat
Sonali Phogat Murder Case: संशयित रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांना जामीन मंजूर

CBI ला कर्लीज क्लबमध्ये काय सापडले?

शुक्रवारी सीबीआयची टीम कर्लेज क्लबमध्ये पोहोचली, जिथे सोनाली यांना ड्रग्ज देत असताना सुधीर सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. इतकचं नाही तर सोनाली यांची तब्येत बिघडली असताना, दुसऱ्या एका सीसीटीव्हीमध्ये तो सोनाली यांना बाथरुममध्ये घेऊन जाताना दिसत आहे. सोनाली त्या बाथरुममध्ये जवळपास 2 तास थांबल्या होत्या. सीबीआयच्या टीमने संपूर्ण कर्लेज क्लबचे थ्रीडी मॅपिंग केले, व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी कर्लेज कर्मचाऱ्यांची चौकशी केली आणि सोनाली दोन तास थांबलेल्या बाथरुममधून पुरावे गोळा केले.

Sonali Phogat
Sonali Phogat Case : ‘सीबीआय’कडून ‘कर्लिस’ची झडती

खूनाचा नेमका हेतू काय होता?

सोनाली फोगट खून प्रकरणात गोवा पोलिसांना (Goa Police) हत्येमागील हेतू शोधण्यात आतापर्यंत अपयश आले आहे. त्यामुळे आता हत्येचा हेतू शोधणे हे सीबीआयसमोर मोठे आव्हान आहे. सीबीआय सर्व लिंक जोडण्याचा प्रयत्न करत आहे. सीबीआयमधील सूत्रांवर विश्वास ठेवला तर मंगळवारी सीबीआय सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयात (Court) अर्ज करु शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com