
पणजी : सोनसोडो येथील जुनाट कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे 10 टक्के काम बाकी आहे. ते पूर्ण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मडगाव पालिकेला दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे मडगाव पालिकेला आता या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.
या कामाची तपासणी करून त्याचा अहवाल 28 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. कचरा उचलणे व त्यावर आवरण घालण्याचे काम गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार केले आहे. येथील संरक्षक कुंपण पावसाळ्यात कोसळल्याने कचरा विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली आहे.
सोनसोडो कचरा यार्डावरील प्रक्रिया प्रकल्पाची भिंत मागच्याच आठवड्यात पुन्हा कोसळण्याची घटना घडली. यापूर्वी 25 मार्चला या प्रकल्पाची एकाबाजूची भिंत आत साठविलेल्या कचऱ्याच्या वजनाने कोसळली होती. आता दुसऱ्या बाजूची भिंत कोसळली आहे. मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी रोहित कदम यांना याबद्दल विचारले असता त्यांनी वृताला दुजोरा दिला. मागच्या काही दिवसात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही भिंत खचली असावी असे ते म्हणाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.