परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सोनू सूदने केली गोवा मुख्यामंत्रांकडे मागणी

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

जेव्हा देशभरात परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत तेव्हा गोवा आणि इतर राज्यांत परीक्षा आयोजित करण्याचा काहीही उपयोग नाही.

पणजीः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या गोव्यातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बॉलिवूड स्टार सोनू सूद याने मंगळवारी ट्विट केले आहे. जेव्हा देशभरात परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत तेव्हा गोवा आणि इतर राज्यांत परीक्षा आयोजित करण्याची काहीही गरज नाही. असे सोनू सूद म्हणाला. एडुमिनऑफ इंडिया यांना देखील सोनुने परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विनंती केली आहे. सोनुने उर्वरित राज्यांना देखील विनंती केली आहे कि त्यांनी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये. आपण सध्या फार मोठी लढाई लढत आहोत. सोनुने ट्विटमध्ये पोस्टपोन एक्साम 2020 नावाचा हॅशटॅग देखील वापरला आहे.  श्रेयश देसाई नावाच्या विद्यार्थ्याने ट्विट करून सोनूला विनंती केली की हा प्रश्न त्याने गोव्याचे मुख्यामंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे मांडावा. त्यानंतर सोनुने ट्विटकरत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. (Sonu Sood demands postponement of exams from Goa Chief Minister)

कोविडोद्रेक : एका दिवसात २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

सोनू सर कृपया गोव्याच्या मुख्यमंत्रांशी बोला आणि 12 विच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करा. 12 विच्या बोर्डच्या परीक्षा 24 एप्रिल 2021 पासून सुरु होणार आहेत. गोव्यामध्ये कोरोना नियंत्रणा बाहेर गेला आहे. 17 एप्रिलला गोव्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले. कृपया त्वरित आपण विनंती करावी अशी मागणी श्रेयश देसाईने सोनुकडे केली आहे. गोव्यातील नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. सोनुने त्यांचे आभार मानले आहे. 

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्याबद्दल एनएसयूआयचे अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी ट्विट करत सोनूचे आभार मानले आहे. गोव्यातील एकूण 43,547 विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी पात्र आहेत.  दहावीची परीक्षा 13 एप्रिल पासून तर बारावीची परीक्षा 25 एप्रिलपासून सुरु होणार आहे. मागच्या २४ तासामध्ये गोव्यामध्ये 1140 रुग्ण आढळले आहेत तर 440 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्याचबरोबर, 26 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

संबंधित बातम्या