फायर हायड्रन्ट प्रश्न मार्गी लावा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

फायर हायट्रन्ट कार्यान्वित करण्यासाठी मार्केट परिसरात पाण्याची टाकी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, टाकी उभारण्याचा निर्णय अद्याप मार्गी लागलेली नाही. मार्केटमध्ये सासष्टी बरोबर दक्षिण गोव्यातील लोकांची मोठ्या संख्येने वर्दळ होत असल्यामुळे ग्राहक तसेच विक्रेत्यांच्या भल्यासाठी अनेक वर्षापासून रखडलेला फायर हायड्रन्ट प्रश्न मार्गी लावाला अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 

 सासष्टी:  आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मडगाव शहरात गांधी मार्केट, न्यू मार्केट आणि एसजीपीडीए मार्केट ही तीन महत्वापूर्ण बाजारपेठ असून सणासुदीच्या काळात या तिन्हीही मार्केटमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते. या मार्केटमध्ये एकही सुरक्षाव्यवस्था धड नसून आग लागण्याची दुर्घटना घडल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी असलेला फायर हायड्रन्ट गेल्या कित्येक वर्षांपासून बिन कामाचा पडून आहे.

फायर हायट्रन्ट कार्यान्वित करण्यासाठी मार्केट परिसरात पाण्याची टाकी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, टाकी उभारण्याचा निर्णय अद्याप मार्गी लागलेली नाही. मार्केटमध्ये सासष्टी बरोबर दक्षिण गोव्यातील लोकांची मोठ्या संख्येने वर्दळ होत असल्यामुळे ग्राहक तसेच विक्रेत्यांच्या भल्यासाठी अनेक वर्षापासून रखडलेला फायर हायड्रन्ट प्रश्न मार्गी लावाला अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 

मडगावमधील न्यू मार्केट आणि गांधी मार्केटमध्ये दोन वर्षात पाच दुकांनाना आग लागण्याचा घटना घडलेल्या आहेत. परंतु, सरकार तसेच मडगाव पालिका यावर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. मार्केटमध्ये निष्क्रिय अवस्थेत पडून असलेला फायर हायड्रन्ट दुरुस्त करण्याची आवश्यकता भासत असून हायड्रन्टसाठी बसविण्यात आलेली वाहिनींही कमकूवत बनलेली आहे. मार्केटकडून अग्नी शामक कार्यालय एक किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण, मार्केटमध्ये आग लागण्याची घटना घडल्यास मार्केट परिसरात करण्यात येणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे अग्नीशामक दलाच्या बंबला घटनास्थळी पोहचण्यास उशिर होतो. यावर तोडगा काढण्यासाठी मार्केटमध्ये वाहतुक सुरळीत तसेच बेशिस्त पार्किंगवर आळा घालण्यासाठी वाहतुक पोलिस तैनात करणे महत्वाचे आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.  

पार्किंगचा मुद्दा ग्राहक व विक्रेत्यांसाठी डोकेदुखी आहे. मात्र, आगीचा मुद्दा धोकादायक ठरु शकतो. मडगाव गांधी मार्केट व न्यू मार्केटमध्ये फायर हायड्रन्ट उपलब्ध आहे. पण, पाणी पुरवठा करणारी टाकीच अद्याप उभारण्यात न आल्यामुळे फायर हायड्रन्ट व्यर्थच पडून आहे. मार्केटमध्ये आग लागल्यास आमदार तसेच मंत्री घटनास्थळी पोहचतात. मात्र, टाकी उभारण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाहीत. टाकी उभारण्याची फाईल सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वळविण्यात आलेली आहे. पण, ही फाईल खात्याकडे तशीच पडून आहे. असे न्यू मार्केटचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी सांगितले. पाण्याची टाकी उभारण्यासाठी व्यापाऱ्यांनी अनेक वेळा पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनही दिलेले आहे. पण, अद्याप काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. 

फायर हायड्रन्ट कार्यान्वित करण्यासाठी महत्वपूर्ण असलेला टाकीचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा घोषणाबाजी करण्यात आली आहे. पण अजून काही टाकी उभारण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आलेला नाही. अनेकवेळा टाकी उभारण्यासाठी जागा निश्चित करूनही टाकी उभारण्याचा मुद्दा मध्येच रखडला आहे. हायड्रन्टसाठी घालण्यात आलेली वाहिनीही जुनी होऊन त्याची क्षमताही कमी झालेली असून टाकी बांधताना वाहिनींचीही पाहणी करणे आवश्यक आहे, असे छाया पालिका मंडळाचे अध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी सांगितले. मार्केटमध्ये एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी फायर हायड्रन्टचा मुद्दा मार्गी लावावा, 

संबंधित बातम्या