पत्नीवर खुनी हल्ला ,दीड वर्षांनंतर पतीचं ठरला आरोपी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी पूनम डुंगडुंग हिच्यावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने विलखन तिरकी याला 326 कलमाखाली दोषी ठरवून तीन वर्षांची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे
पत्नीवर खुनी हल्ला ,दीड वर्षांनंतर पतीचं ठरला आरोपी
South Goa Sessions Court announce 3 years jail in Navelim caseDainik Gomantak

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी पूनम डुंगडुंग हिच्यावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने विलखन तिरकी याला 326 कलमाखाली दोषी ठरवून तीन वर्षांची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे . संशयितांचा आतापर्यंत कैदेत असलेला काळ शिक्षेच्या कालावधीतून वगळण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.मडगाव सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश इर्षद आगा यांनी हा निवाडा दिला असून सरकारतर्फे ॲड. व्ही. जी. कोस्ता यांनी बाजू मांडली. (South Goa Sessions Court announce 3 years jail in Navelim case)

न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, 1 एप्रिल 2019 रात्रीच्या सुमारास नावेलीत ही घटना घडली होती. विलखन हा मूळ झारखंड येथील रहिवासी असून पत्नीसोबत नावेली येथे राहात होता. पत्नीने आपला विश्वासघात केल्याच्या संशयावरून 1 एप्रिल रोजी पती व पत्नीमध्ये वाद झाला. नंतर रागाच्या भरात विलखन याने दगडाने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिला जखमी केले. याप्रकरणी तक्रार नोंद झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली होती.


South Goa Sessions Court announce 3 years jail  in Navelim case
'जीआयडीसी’चे रस्‍ते खड्डेमय,नागरिकांमध्ये संताप

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com