दक्षिण गोव्यात11 एप्रिलला होणार बत्ती गुल

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील 220 KV उपकेंद्र, 220 KV कुंकळ्ळी उपकेंद्र आणि 110KV केव्‍ही वेर्णा उपकेंद्रातील वार्षिक दुरुस्तीकामासाठी 11 एप्रिल रोजी सकाळी 7 ते दुपारी2 पर्यंत, वीजप्रवाह खंडित करण्यात येणार आहे.

आगोंद: दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील 220 KV उपकेंद्र, 220 KV कुंकळ्ळी उपकेंद्र आणि 110KV केव्‍ही वेर्णा उपकेंद्रातील वार्षिक दुरुस्तीकामासाठी 11 एप्रिल रोजी सकाळी 7 ते दुपारी2 पर्यंत, वीजप्रवाह खंडित करण्यात येणार असल्याचे वीज खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. 

संपूर्ण काणकोण, सासष्टी, सांगे, केपे, मुरगाव आणि किर्लपाल, दाभाळ, शिगांव, कुळे, मोले, हे धारबांदोडा तालुक्याचे काही भाग तसेच पंचवाडी ग्रामपंचायत क्षेत्र, ह्या फोंडा तालुक्यातील भागात वीजपुरवठा खंडित राहणार असल्याचे वीज खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

गोमंतकीयांना दिलासा; नवीन वाहतूक कायदा तूर्तास स्थगित 

दरम्यान वीज खात्याने थकीत वीज बिले भरण्यासाठी जारी केलेल्या एकरकमी वीज बिल फेड योजनेचा लाभ घेतलेल्या ग्राहकांना खात्याच्या तांत्रिक चुकीचा फटका बसू लागला होता. काही ग्राहकांनी थकीत बिलाचा पहिला हप्ता भरल्यानंतर ते दुसरा हप्ता भरण्यासाठी ऑनलाईन प्रयत्न करत असताना तुमचा पहिला हप्ता अद्याप भरलेला नाही असा संदेश त्यांना मिळत होता.याबाबत वीज खात्याचे मुख्य अभियंता राजीव सामंत यांना विचारले असता अवघ्या काही ग्राहकांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचे त्यांनी मान्य केले होते.  

गोवा: अखेर सोपो कंत्राटदार आणि मासळी विक्रेत्यांमधील वाद मिटला

संबंधित बातम्या