वाढदिवस आला अंगलट; सभापती कोविड पॉझिटिव्ह

गोवा सभापती कोविड पॉझिटिव्ह आल्याने लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले
वाढदिवस आला अंगलट; सभापती कोविड पॉझिटिव्ह
Speaker Rajesh Patnekar Covid PositiveDainik Gomantak

डिचोली: गेल्या आठवड्यात आपला वाढदिवस (Birthday) मोठ्या उत्साहात साजरा केलेले डिचोलीचे (Bocholim) आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Speaker Rajesh Patnekar) हे कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive)आले आहेत. सध्या त्‍यांना गोमेकॉत (GMCH) दाखल करण्‍यात आले आहे.

गेल्या आठवड्यात 23 सप्‍टेंबरला पाटणेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यानिमित्त हिराबाई झांट्ये सभागृहात आयोजित केलेल्या सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे आणि संघटनमंत्री सतीश धोंड आदी नेते उपस्थित राहिले होते. मागाहून सदानंद शेट तानावडे आणि नंतर सतीश धोंड हे दोघेही कोविड पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर आज सभापती पाटणेकर यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्‍ह आला.

Speaker Rajesh Patnekar Covid Positive
Goa Election: तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व 40 जागा लढविणार

काहींनी घेतले घरात कोंडून

दरम्‍यान, वाढदिवसाला उपस्थिती लावलेल्‍यांमध्‍ये सध्‍या खळबळ माजली असून कोविड चाचणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी तर स्वत:ला घरात बंद करुन घेतले असल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.

Speaker Rajesh Patnekar Covid Positive
तृणमूल म्हणजे काँग्रेसने विकत बोलाविलेले श्राद्ध

सभापतींच्या वाढदिवसानंतर दोन दिवसांनी डिचोलीत ‘सरकार तुमच्या दारी’ या कार्यक्रमाला डिचोलीतील गावागावांतून लोक आल्‍यामुळे प्रचंड गर्दी उसळली होती. सदानंद शेट तानावडे वगळता वाढदिवस सोहळ्याला उपस्थित राहिलेले बहुतांश सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यामुळे या कार्यक्रमातही संसर्ग फैलावला तर नाही ना, अशी भीती शहराबरोबरच गावोगावी व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.