इफ्फीमध्ये अशी केली जाणार पाहुण्यांसाठी खास व्यवस्था

सिनेमा जगणाऱ्या रसिकांसांठी इफ्फी महोत्सव म्हणजे विशेष पर्वणीच असते
इफ्फीमध्ये अशी केली जाणार पाहुण्यांसाठी खास व्यवस्था
इफ्फीमध्ये अशी केली जाणार पाहुण्यांसाठी खास व्यवस्थाDainik Gomantak

राज्यात आजपासून सुरू होणाऱ्या 52व्या इफ्फी महोत्सवाची लगबग पणजीत दिसायला लागली आहे. सिनेमा जगणाऱ्या रसिकांसांठी इफ्फी महोत्सव म्हणजे विशेष पर्वणीच असते. या महोत्सवाला जगभरातून रसिक दर्शक हजेरी लावतात.

2004 ते 2021 चा इफ्फीचा प्रवास पाहता, त्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगाने कित्येक बदल झालेले दिसतात. महोत्सवात सिनेमा पाहण्यासाठी आणि सिनेमाचे तंत्र शिकण्यासाठी येणाऱ्यांस ते नक्कीच जाणवेल. प्रत्यक्ष ते आभासी मंचापर्यंत इफ्फीने आजपर्यंत पल्ला गाठला आहे. यंदाचा इफ्फी हा ओटीटी माध्यमांशी सहयोग करून पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात इफ्फी महोत्सवाचे आयोजन फिस्कटणार की काय असा प्रश्न भुवया उंचावत असतानाच, इच्छा असल्यास मार्ग सापडतो या उक्तीला अनुसरून आयोजकांनी इफ्फी महोत्सवाचे आयोजन केले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असल्याचे दृश्‍य गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिसरात, तसेच आयनॉक्सच्या परिसरात पाहायवयास मिळत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्व‍भूमीवर आरोग्यविषयक नियमाचे पालन करून इफ्फी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे असे गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई म्हणाले.

इफ्फी महोत्सवादरम्यान दाखविण्यात येणारे सिनेमे पणजी आणि पर्वरी येथील आयनॉक्सच्या प्रत्येकी 4 स्क्रीनमध्ये दाखविण्यात येणार आहेत. त्याशिवाय मॅकेनिझ पॅलेसच्या दोन स्क्रीनवरही सिनेमा दाखविले जातील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृहातील आसन व्यवस्थेचे नियम कटाक्षपणे पाळण्यात आले आहेत. त्यामुळे या सगळ्या सिनेमागृहात मिळून 2515 प्रतिनिधींसाठी आसनव्यवस्था उपलब्ध असेल असे त्यांनी सांगितले. महोत्सवासाठी अडीच हजाराहून जास्त प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे.

प्रतिनिधिनिसाठी खास व्यवस्था

पर्वरी येथील आयनॉक्समध्ये प्रतिनिधीना जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे करण्यात आली आहे. यासाठी 10 कदंब बस व 20 ऑटोरिक्षा सेवा येथील आयनॉक्स सिनेमागृहाच्या बाहेर उपलब्ध असतील.

इफ्फीमध्ये अशी केली जाणार पाहुण्यांसाठी खास व्यवस्था
गोवा विभागातील सिनेमांचे गुपित कायम!

हायब्रिड असल्याने आसनव्यवस्था पुरेशी

कला अकादमीच्या वास्तूचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे यंदा इफ्फीत विविध कार्यक्रमाचे आयोजन येथे होऊ शकणार नाही. कला अकादमीत यापूर्वी मास्टरक्लास, सिनेमाशी निगडीत परिसंवाद, तसेच इफ्फी महोत्सवाच्या उदघाटन व समारोप सोहळ्यानंतर दाखविण्यात येणारे सिनेमा दाखविण्यात यायचे. कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात 980 जणांची आसनव्यवस्था होती, त्याशिवाय ब्लॅक बॉ्क्समध्येही इफ्फीशी निगडीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यायचे. यावर्षी वास्तूचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे हे उपक्रम राबविणे शक्य नाही. इफ्फी महोत्सवाचे आयोजन हायब्रीड पध्दतीने होत असल्याकारणाने मर्यादित संख्येने असणार्या प्रतिनिधीना आवश्यक असेलली आसनव्यवस्था यावर्षी उपलब्ध आहे. मास्टरक्लास व अन्य कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन पद्दतीने करण्यात आले आहे. या शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून कला अकादमीत होणारे अन्य कार्यक्रम पणजी येथील आयनॉक्स आणि मॅकनिझ पॅलेसच्या सभागृहात आयोजित करण्यात येतील.

इफ्फीमध्ये अशी केली जाणार पाहुण्यांसाठी खास व्यवस्था
यंदा इफ्फित व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवांना महोत्सवासाठी आमंत्रित

हायब्रिड इफ्फी

52 वा इफ्फी हा दुसरा हायब्रिड इफ्फी आहे. 16 ते 24 जानेवारी 2021 या काळचा 51वा इफ्फी हा पहिला हायब्रिड इफ्फी होता. त्यावेळी हायब्रिड इफ्फी कसा असेल याबद्दल बरीच अनिश्चितता होती. तो सुखरूप पार पडला. या दुसऱ्या हायब्रिड इफ्फीत गेल्या वर्षीचा अनुभव नक्कीच उपयोगी पडेल . हायब्रिड फेस्टिव्हलचे दोन भाग आहेत, एक प्रत्यक्ष आणि दुसरा आभासी.

प्रत्यक्ष

 •  उद्घाटन आणि समारोप समारंभ

 •  आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग 15 चित्रपट (12 विदेशी चित्रपट आणि 3 भारतीय चित्रपट)

 •  विविध विभागांमधले जागतिक सिनेमा

 •  इंडियन पॅनोरमा (24 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स)

 •  श्रेष्ठ भारतीय दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निवडक चित्रपट

 •  कंट्री फोकस (BRICS)

 •  फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप (इतर आंतरराष्ट्रीय चित्रपटातील प्रशंसीत चित्रपट)

 •  फेस्टिव्हल्स ऑफ द वर्ल्ड

 •  भारतीय विभागातील निवडक चित्रपट

आभासी

 •  उद्घाटन सोहळा आणि समारोप सोहळा (लाइव्ह स्ट्रीमिंग)

 •  श्रद्धांजली

 •  मास्टरक्लासेस

 •  परिसंवाद सत्रे

 •  भारतीय विभागातील चित्रपट

 •  जागतिक चित्रपट

 •  आभासी महोत्सवासाठी स्वतंत्र नोंदणी आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com