कचरा व्यवस्थापनासाठी मडगाव पालिकेचा खास विभाग!

कचरा उचल करण्याबरोबर त्या कचऱ्याची प्रभावी विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या पथकाला देण्यात आली आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी मडगाव पालिकेचा खास विभाग!
Special department of Margao Municipality for waste managementDainik Gomantak

मडगाव: मडगाव शहरातील कचरा व्यवस्थापन हाताळण्यासाठी मडगाव पालिकेने चार जणांचा खास विभाग सुरू केला असून कचरा उचल करण्याबरोबर त्या कचऱ्याची प्रभावी विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या पथकाला देण्यात आली आहे.

(Special department of Margao Municipality for waste management)

Special department of Margao Municipality for waste management
जमीन हडपप्रकरणी दुसरी अटक; एसआयटीने आवळला फास

पालिका अभियंते विशांत नाईक हे या पथकाचे प्रमुख असून कनिष्ठ अभियंते सज्जन गावकर, सफाई निरीक्षक विराज आराबेकर तसेच दामोदर मेत्री या कामगाराची या पथकात नियुक्ती केली आहे. या पथकाच्या दिमतीला एक वाहन आणि एक ड्रायव्हर देण्यात आला आहे.

सज्जन गावकर यांच्यावर रोजच्या देखरेखीची जबाबदारी देण्यात आली असून सर्व पर्यवेक्षकांनी गावकर यांच्याशी संपर्क साधून काम करावे, असा आदेश मुख्याधिकारी रोहित कदम यांनी जारी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com