Zuari Bridge: ATS, पोलिस कोणालाच सूट नाही! झुआरी पुलावर विशेष मोहिम; अवजड वाहनांची लेन मोडणाऱ्यांवर कारवाई

अवजड वाहनांची लेन मोडणाऱ्या वाहनांवर आज पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील झालेल्या विशेष मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात आली.
Zuari Bridge
Zuari BridgeDainik Gomantak

Zuari Bridge: मागील काही दिवसांपूर्वी झुआरी पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. पणजीच्या दिशेने एकेरी वाहतूक तर, मडगावच्या दिशेने जाणारी दुसरी लेन फक्त अवजड वाहनांसाठी खुली आहे. मात्र, अनेक वाहनचालक अवजड वाहनांची लेन मोडून त्यातून वाहन चालवतात.

असेच अवजड वाहनांची लेन मोडणाऱ्या वाहनांवर आज पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील झालेल्या विशेष मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी या लेनमधून आलेल्या ATS आणि गोवा पोलिसांच्या वाहनावर देखील कारवाई करण्यात आली.

झुआरी पुलावर पणजी ते मडगाव दिशेला अवजड वाहनांसाठी सिंगल लेन निर्माण करण्यात आली आहे. मात्र, हलकी वाहने देखील या लेनचा वापर करत आहेत. या लेनचा वापर धोकादायक असून लेनची शिस्त मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात आली. यावेळी नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

लोकांनी या दिशेने येताना मार्गावर लावलेल्या दिशादर्शन चिन्हांची मदत घ्यावी. काही वाहन चालक गुगल मॅपची मदत घेतात आणि नियम मोडतात. तर त्यांनी तसे करू नये असे आवाहन देखील पोलिसांनी यावेळी केले.

Zuari Bridge
Zuari BridgeDainik Gomantak
Zuari Bridge
Accident On Atal Setu: अटल सेतूवर कार आणि सांडपाणी ट्रकचा अपघात

अवजड वाहनांसाठी असलेली ही लेन हलक्या वाहनांनी (दुचाकी, तीनचाकी इ.) वापरू नये असे वारंवार आवाहन करण्यात आले आहे. मात्र, वाहन चालक पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लेक्ष करतात आणि नियम मोडतात. पण, नियम मोडल्याने अपघातांना निमंत्रण दिले जाते, नागरिकांना नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, वाहनचालकांना वारंवार सांगून देखील ते नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. शिवाय येथे कोणी पोलिस कर्मचारी नसल्याचा गैरफायदा घेतला जातो, त्यामुळे ही कारवाई लोक नियमांचे पालन करत नाहीत तोवर सुरूच राहणार असल्याचे पोलिस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com