गोवा राज्य आरोग्य खात्यातर्फे विशेष महा कोविड लसीकरण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने राज्यातील 60 वर्षावरील सर्व नागरिक व 45 वर्षावरील आजारी नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी आज १५ मार्च आणि उद्या 16 मार्च रोजी महा कोविड लसीकरण मोहीम आयोजित केली आहे.

पणजी: राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने राज्यातील 60 वर्षावरील सर्व नागरिक व 45 वर्षावरील आजारी नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी आज १५ मार्च आणि उद्या 16 मार्च रोजी महा कोविड लसीकरण मोहीम आयोजित केली आहे.

या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. गेले चार दिवस विविध माध्यमातून या मोहिमेची जागृती करण्यात आलेले आहे. राज्यातील ज्या 60 वर्षीवरील व 45 वर्षावरील आजारी व्यक्तीनी अद्याप कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही त्यांनी आज किंवा उद्या  जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन कोविड प्रतिबंधक लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

गोव्यातील नगरपालिका निवडणूकांचे आरक्षण व तारीख जाहीर करा अन्यथा... 

सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये ही मोहीम राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहर आरोग्य केंद्र व जिल्हा इस्पितळांमध्ये राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले वय समजण्यासाठी आपले आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्रे आणावीत. तसेच आजारी व्यक्तीनी आपल्या उपचाराची कागदपत्रे घेऊन यावीत, असे कळवण्यात आले आहे. चोवीस तासांत नवे 66 कोरोना रूग्ण गोव्यात आढळले आहे. 

हरमल समुद्रकिनाऱ्यावर वीस हजार रुपयाचे अंमली पदार्थ जप्त 

राज्याला कोरोना नियंत्रण मोहिमेत काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. आज दिवसभरात एका कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचे निधन झाले. केपे येथील 75 वर्षीय महिलेचे आज कोरोनामुळे निधन झाले. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 66 व्यक्ती कोरोना संसर्ग झालेल्या आढळल्या. तर 83 व्यक्ती कोरोना संसर्ग मुक्त झाल्या. आजच्या दिवशी कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 749 ली असून कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती बरे होण्याची टक्केवारी 97.22 वर पोचली आहे.

गोव्यातील बैंक कर्मचाऱ्यांनी पुकारला पणजीतील आझाद मैदानावर संप 

संबंधित बातम्या