मांगोरहिलबाबत आज विशेष बैठक 

mangor hill area
mangor hill area

पणजी 

मांगोर हिलसंदर्भात उद्या ६ जुलै रोजी सकाळी ११ वा. उच्चस्तरीय विशेष बैठक होणार आहे. मुरगाव तालुक्यातील चार आमदार, आरोग्य व पोलिस अधिकारी, संबंधित भागातील नगरसेवक यांना विश्‍वासात घेऊन त्याचा सखोल अभ्यास केला जाईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. मांगोरहिल भागात कोरोना बाधित रुग्णांचा प्रसार फैलावल्याने तो राज्यातील पहिला कनटेन्मेंट झोन करण्यात आला होता. अजूनही या भागात बाधित रुग्ण सापडत असल्याने तो परिसर आज पूर्णपणे निर्जंतुकीकरण तसेच तेथील साफसफाई करण्यात आली. या भागातील लोकांना किराणा माल मोफत पुरविला जाईल. या भागातील लोक हे रोजंदारीवरील असल्याने हा पुरवठा केला जाणार आहे. सुमारे ४०० ते ५०० लोकांच्या कोविड - १९ चाचणी केल्या जातात त्यामध्ये किमान ४ ते ५ जण हे कोरोना बाधित रुग्ण सापडतात त्यामुळे लोकांनी कोणत्याच कार्यक्रमांना तसेच शेजाऱ्यांच्या घरामध्येही जाऊ नये अनेकांना एकमेकांच्या घरी जाण्याची सवय आहे ती ही महामारी असेपर्यंत टाळावी. कोणाला घरी बोलावूही नये. घरात वृद्ध किंवा मुले असल्यास हे कटाक्षाने पाळावे. वाढदिवस तसेच 
विवाह सोहळ्यांना उपस्थिती लावू नये कारण अशा कार्यक्रमांना कोणत्या भागातून लोक येतात व ती व्यक्ती पोझिटिव्ह आहे की नाही याची कल्पना नसते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपस्थिती लावली नाही म्हणून फरक पडत नाही. लोकांनी कोणत्याच कार्यक्रमांना जाऊ नये. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम व योगा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

goa goa goa 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com