गोव्यातील बैलांच्या झुंजी आयोजकांवर पोलिसांच्या खास पथकाचे लक्ष

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

गोव्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या बैलांच्या झुंजी आयोजकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी एक खास पथके स्थापन करावीत आणि कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज दिले.

पणजी :गोव्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या बैलांच्या झुंजी आयोजकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी एक खास पथके स्थापन करावीत आणि कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज दिले. राज्य प्राणी कल्याण मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले प्राणी कल्याण मंडळाच्या बैठकीत बिगर सरकारी संस्था  प्राणी कल्याणाच्या क्षेत्रात वावरणारे कार्यकर्ते यांनी बऱ्याच सूचना केल्या. सरकार त्यांच्या सूचनांचे स्वागत करतो. बैलांच्या झुंजी बेकायदेशीरपणे राज्यात आयोजित केल्या जातात पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. यापुढे अशा बैलांच्या झुंजी आयोजित केल्या जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी खास पथके स्थापन करून कारवाई करावी असे आदेश मी दिले आहेत.

गोवा सरकार सोडविणार पेयजलाची समस्या -

कत्तलीसाठी जनावरांची बेकायदेशीरपणे केली जाणारी वाहतूक हा एक चिंतेचा विषय आहे. त्या विरोधात कारवाई केली जात आहे प्राणी कल्याणासाठी भटकी जनावरे पोषणासाठी ही योजना आहे. त्या योजनेचा निधी पशुवैद्यकीय पशुसंवर्धन खात्याकडून संबंधित पंचायत, पालिका यांना देण्यात येत होता त्यानंतर तो संस्थाना वितरीत केला जात होता. आता ही पद्धत बदलून पशुसंवर्धन पशुवैद्यकिय खात्याकडून हा निधी थेटपणे बिगर सरकारी संस्थांना भटक्या गुरांच्या देखभालीसाठी दिला जाणार आहे. या सुटसुटीतपणामुळे भटक्या गुरांची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे.

पणजी शहरात 13 फेब्रुवारी कार्निव्हल सुरु -

संबंधित बातम्या