पर्रीकरांच्या जयंतीदिनी पणजीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन; मित्रमंडळ उलगडणार "आमचो भाई"

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

येत्या रविवारी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जयंती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मित्रपरिवाराकडून हे आयोजन करण्यात आले आहे.

पणजी- येत्या रविवारी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जयंती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मित्रपरिवाराकडून हे आयोजन करण्यात आले आहे.  येथील मिनेझिस ब्रागांझा संस्था सभागृहात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हा कार्यक्रम होईल. 

मनोहर पर्रीकर यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व याविषयी तसेच पर्रीकर यांच्या संवेदनशील स्वभावाच्या विविध पैलूंवर वक्ते यावेळी बोलणार आहेत. पर्रिकरांबाबत अनेक किस्से त्यांचा मोठा मित्रवर्ग सांगणार असल्याने यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल. 

माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष संजय हरमलकर, ज्येष्ठ पत्रकार व पर्रीकरांवरील पुस्तकांचे लेखक सद्गुरु पाटील, वामन प्रभू व नगरसेवक मिनिन डिक्रुज, पर्रीकर यांचे मित्र राजेंद्र भोबे आदी वक्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांचेही विचार ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

 'आमचो भाई' असा कार्यक्रमाचा विषय आहे असून त्याच अनुषंगाने पर्रीकरांशी निगडीत घटना व आठवणींना कार्यक्रमात उजाळा दिला जाईल.
 पर्रीकर यांचे चाहते, मित्र, भाजप कार्यकर्ते व इतरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांच्य़ा मित्रवर्गाकडून करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या